शत्रूघ्न सिन्हाने प्रॉपर्टीतून सोनाक्षीला केलं बेदखल? 'या' व्यक्तींच्या नावे करणार संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:28 PM2022-01-12T13:28:21+5:302022-01-12T13:29:11+5:30
Sonakshi sinha: सोनाक्षी अभिनेता शत्रूघ्न सिन्हा यांची लेक असून या बाप-लेकीमधील प्रेमळ नातं सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, असं असतांनादेखील शत्रूघ्न सिन्हा यांनी त्यांच्या संपत्तीमधील कोणताही वाटा सोनाक्षीला न देण्याचा निर्णय घेतला आहे.
कलाविश्वातील अनेकदा सिलेब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टारकिड्सची चर्चा रंगत असते. यात आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये (bollywood) अनेक स्टार किड्स असल्याचं पाहायला मिळतं. त्यातलंच एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha). 'दबंग' या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोनाक्षी अभिनेता शत्रूघ्न सिन्हा (shatrughan sinha) यांची लेक असून या बाप-लेकीमधील प्रेमळ नातं सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, असं असतांनादेखील शत्रूघ्न सिन्हा यांनी त्यांच्या संपत्तीमधील कोणताही वाटा सोनाक्षीला न देण्याचा निर्णय घेतला आहे. एका मुलाखतीत त्यांनी त्यांचं मत मांडल्यांचं सांगण्यात येतं. तसंच सोनाक्षीशिवाय ते ही संपत्ती कोणाच्या नावावर करणार हेदेखील त्यांनी सांगितल्याचं म्हटलं जातं.
सध्या सोशल मीडियावर शत्रूघ्न सिन्हा यांची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या संपत्तीविषयी भाष्य केलं आहे. तसंच या संपत्तीमधील वाटा सोनाक्षीला का देणार नाही हेदेखील सांगितलं आहे.
"सोनाक्षी एक स्वावलंबी मुलगी आहे. आतापर्यंत तिने कलाविश्वात जे नाव, प्रसिद्धी, यश किंवा संपत्ती जे काही मिळवलं ते तिच्या स्वत:च्या हिमतीवर मिळवलं आहे. त्यामुळे आता तिला कशाचीही कमतरता नाही. किंबहुना ती आत्मनिर्भर असल्यामुळे तिला या संपत्तीची आवश्यकता भासणार नाही. मला माझ्या लेकीचा अभिमान आहे की आज ती तिच्या पायावर उभी आहे", असं शत्रूघ्न सिन्हा म्हणाले.
दरम्यान,सोनाक्षीला जरी या संपत्तीमधील वाटा मिळणार नसला तरीदेखील शत्रूघ्न सिन्हा त्यांची सगळी संपत्ती लव आणि कुश या त्यांच्या दोन मुलांच्या नावावर करणार असल्याचं म्हटलं जातं.