जहीर इक्बालसोबतच्या रिलेशनशिपवर सोनाक्षी सिन्हा म्हणते, कब, कैसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 13:26 IST2019-04-10T13:25:20+5:302019-04-10T13:26:43+5:30
‘नोटबुक’ या चित्रपटाचा लीड हिरो जहीर इक्बाल व सोना या दोघांत काहीतरी खिचडी शिजतेय, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आत्तापर्यंत सोनाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अखेर तिने चुप्पी तोडलीच.

जहीर इक्बालसोबतच्या रिलेशनशिपवर सोनाक्षी सिन्हा म्हणते, कब, कैसे?
ठळक मुद्देसोनाक्षी आधी बंटी सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण याचवर्षी फेब्रुवारीत दोघांचेही ब्रेकअप झाले.
बॉलिवूडची ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा सध्या ‘कलंक’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान सोनाक्षीच्या अफेअरच्या चर्चाही जोरात आहे. अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘नोटबुक’ या चित्रपटाचा लीड हिरो जहीर इक्बाल व सोना या दोघांत काहीतरी खिचडी शिजतेय, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. आत्तापर्यंत सोनाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण अखेर तिने चुप्पी तोडलीच.
जहीर इक्बालसोबत तुझे नाव जोडले जातेय. यात किती सत्यता आहे? असा थेट प्रश्न सोनाला विचारण्यात आला आणि ‘कब? कैसे?’, असे दोन शब्द सोनाक्षीच्या तोंडून बाहेर पडले.
‘असे अजिबात नाही. खरे सांगायचे तर असे काहीही नाही. त्यामुळे मी या प्रश्नावर बोलावे, याचीही मला गरज वाटत नाही. मी प्रेमात पडलीच, तर सर्वप्रथम मीडियाला सांगेल’, असे सोनाक्षी म्हणाली. केवळ इतकेच नाही तर, माझ्या स्वप्नाचा राजकुमार मला कधी एकदा भेटतो, असे मला झालेय. मी तर आतुरतेने प्रतीक्षा करतेय. पण दुर्दैवाने सध्या माझ्या आयुष्यात कुठलाही राजकुमार नाही. तो आला की, मीच जगाला ओरडून सांगेल, असे सोनाक्षी म्हणाली.
जहीरसोबतच्या डेटींगची चर्चा अफवा असल्याचे सोनाक्षीने भलेही हसण्यावारी नेले असले तरी या दोघांची मैत्री दिवसेंदिवस बहरते आहे, हे मात्र नक्की. महिनाभरापूर्वी जहीरने मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये आपल्या वाढदिवसाची पार्टी दिली होती. सलमान खान, आयुष शर्मा, सूरज पांचोली, प्रनूतन बहल असे अनेक जण या पार्टीत हजर होती. सोनाक्षीही या पार्टीत होती आणि प्रत्यक्षदशीर्चे मानाल तर सोना व जहीर यांची पाटीर्तील केमिस्ट्री बरेच काही सांगणारी होती. सोनाक्षी आधी बंटी सचदेवासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण याचवर्षी फेब्रुवारीत दोघांचेही ब्रेकअप झाले. खरे तर दोघांचेही रिलेशन लग्नापर्यंत पोहोचणार असे मानले जात होते. पण अचानक त्यांच्या ब्रेकअपची खबर आली.