OMG! ‘इंडिगो’वर भडकली सोनाक्षी सिन्हा, व्हिडीओ पोस्ट करत घेतला खरपूस समाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 03:27 PM2019-11-04T15:27:38+5:302019-11-04T15:28:13+5:30

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ट्विटरवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

sonakshi sinha slams airline staff for breaking her luggage shared | OMG! ‘इंडिगो’वर भडकली सोनाक्षी सिन्हा, व्हिडीओ पोस्ट करत घेतला खरपूस समाचार

OMG! ‘इंडिगो’वर भडकली सोनाक्षी सिन्हा, व्हिडीओ पोस्ट करत घेतला खरपूस समाचार

googlenewsNext
ठळक मुद्देसोनाची ही उपरोधिक पोस्ट व्हायरल होताच,  इंडिगोच्या अधिका-यांनी तिच्या पोस्टची त्वरित दखल घेत, तिची माफी मागितली.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिने ट्विटरवर शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सोनाक्षीने इंडिगो एअरलाईन्सचा खरपूस समाचार घेतला आहे.  होय, सोनाक्षीने इंडिगोवर तिच्या ट्रॅव्हल बॅगचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे.
 सोनाने डॅमेज बॅगचा व्हिडीओ पोस्ट करत, याची माहिती दिली.



 

‘मी इंडिगो एअरलाइन्सच्या विमानातून प्रवास केला. मी एक परफेक्ट बॅग घेऊन प्रवासाला निघाले होते. पण ही बॅग माझ्याकडे आली तेव्हा तिचे पहिले व दुसरे हँडल पूर्णपणे तुटलेले होते. बॅगची चाके निखळली होती. माझी बॅग तोडल्याबद्दल इंडिगोचे आभार,’ असे सोनाने हा व्हिडीओ पोस्ट करताना लिहिले.




सोनाची ही उपरोधिक पोस्ट व्हायरल होताच,  इंडिगोच्या अधिका-यांनी तिच्या पोस्टची त्वरित दखल घेत, तिची माफी मागितली. पण हे प्रकरण इथेच संपले नाही. नेटक-यांनी यावर मजेदार प्रतिक्रिया दिल्या.  आतापर्यंत काही तासात सहा हजार पेक्षा अधिक नेटक-यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.  
‘सर्वसामान्य माणसाची बॅग तुटली असती तर इंडिगोने जराही दखल घेतली नसती,’ असे एका युजरने लिहिले. अन्य एका युजरने सोनाला नवी बॅग खरेदी करण्याचा सल्ला दिला. तर दुस-या युजरने ‘आता इंडिगो नुकसानभरपाईदाखल सोनाला 500 रूपयांचे व्हाऊचर देतील,’ अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली. एका युजरने तर चक्क सोनाला ओरिजनल कंपनीची बॅग खरेदी करण्याचा सल्ला दिला.

 
 

Web Title: sonakshi sinha slams airline staff for breaking her luggage shared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.