"...त्यामुळे ते मला मारायचेही"; सोनाक्षी सिन्हा लग्नाला न आलेल्या भावांबद्दल काय बोलून गेली?
By देवेंद्र जाधव | Updated: March 1, 2025 18:07 IST2025-03-01T18:06:26+5:302025-03-01T18:07:32+5:30
सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच एका मुलाखतीत तिचे सख्खे भाऊ लव-कुश बद्दल एका मुलाखतीत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे (sonakshi sinha)

"...त्यामुळे ते मला मारायचेही"; सोनाक्षी सिन्हा लग्नाला न आलेल्या भावांबद्दल काय बोलून गेली?
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (sonakshi sinha) ही चर्चेतील अभिनेत्री. सोनाक्षीला आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. सोनाक्षी सिन्हाने काहीच महिन्यांपूर्वी तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नाला सोनाक्षीच्या घरच्यांचा विरोध होता अशीही चर्चा रंगलेली. पण नंतर शत्रूघ्न सिन्हा (shatrughna sinha) पत्नीसह लेकीच्या लग्नाला उपस्थित राहिले. पण सोनाक्षीचं भावंडं लव आणि कुश सोनाक्षीच्या कोणत्याही लग्नकार्यात दिसली नाहीत. अलीकडेच एका मुलाखतीत सोनाक्षीला तिच्या भावंडांबद्दल विचारण्यात आल्यावर ती काय म्हणाली?
लग्नाला न आलेल्या भावंडांबद्दल सोनाक्षी काय म्हणाली?
नुकतंच एक मुलाखतीत सोनाक्षीने तिच्या भावंडांबद्दल खुलासा केला की, "मी घरातली सर्वात छोटी मुलगी आहे. त्यामुळे सर्वांची मी लाडकी आहे. याच गोष्टीमुळे भावंडं माझ्यावर जळतात. त्यांनी अनेकदा मला मारलंही आहे. जसं प्रत्येक घरात बहिण-भावाची भांडणं होतात तसंच माझंही लव आणि कुशसोबत भांडणं होतात. पण हे नॉर्मल आहे." असा खुलासा सोनाक्षीने केलाय.
सोनाक्षी-जहीरचं इंटरकास्ट मॅरेज
सोनाक्षी आणि जहीरने काही महिन्यांपूर्वी मुंबईतील घरातच रजिस्टर मॅरेज केलं. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत त्यांचं लग्न झालं. यामध्ये कोणालाही धर्म बदलावा लागला नाही. लग्नात सोनाक्षीचे आई-बाबा अर्थात दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा दोघांनी लेकीला आशीर्वाद दिला. मात्र यावेळी सोनाक्षीचे भाऊ दिसले नाहीत. ते अजूनही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. पण याविषयी सोनाक्षीने नाहक भावंडांची तक्रार केली नाही. सोनाक्षी सध्या जहीरसोबत सुखाचा संसार करत आहे. याशिवाय ती तिच्या फिल्मी करिअरकडेही लक्ष देत आहे.