सलमान खानच्या 'दबंग'मध्ये सोनाक्षी सिन्हाची अशी झाली कास्टिंग, म्हणाली- "हे अरेंज मॅरेजसारखं होतं"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 02:37 PM2024-11-25T14:37:10+5:302024-11-25T14:38:51+5:30
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हा तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबत खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिने 'दबंग'साठी तिची कास्टिंग कशी झाली याचा खुलासा केला आहे.
सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)ने सलमान खान(Salman Khan)च्या 'दबंग' (Dabang Movie) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१० साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला. तेव्हापासून दबंगच्या प्रत्येक भागात सोनाक्षी दिसत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाक्षीने दबंगसाठी तिची कास्टिंग कशी झाली याचा खुलासा केला आहे. सोनाक्षीने करीना कपूरच्या व्हॉट वुमन वॉन्ट या पॉडकास्टमध्ये याचा खुलासा केला.
सोनाक्षी सिन्हाने नुकतीच करीना कपूरच्या पॉडकास्टला हजेरी लावली होती. जिथे तिने सांगितले की, अमृता अरोराच्या लग्नात सलमान आणि अरबाज खानने तिला पहिल्यांदा पाहिले होते. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. अमृता अरोराच्या लग्नात सलमान आणि अरबाज खान यांनी मला पाहिले होते. तोपर्यंत माझे वजन कमी झाले होते. ते मला म्हणाले की, 'तो काहीतरी लिहितोय आणि त्याला वाटलं की मी या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. मी त्यांना कधीच गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर, स्क्रिप्ट सांगण्यासाठी ते माझ्या घरी आले. माझे संपूर्ण कुटुंब बसून ऐकत होते. त्यांनी होकार दिला, हात मिळवला आणि निघून गेले. पुढची गोष्ट म्हणजे मी दबंगच्या सेटवर होते. जणू काही अरेंज मॅरेज होत आहे. पण सेटवर पोहोचल्यावर मला हे करायचं आहे हे मला जाणवलं आणि तेव्हापासून मी हे करत आहे. मी त्यावेळी वजन कमी केलेली किशोरवयीन होते. मला चित्रपट करायचे आहेत का, असे कोणीही विचारले नव्हते. मला फक्त सांगण्यात आले की तू हे करत आहे.
हे खूप अचानक झाले- सोनाक्षी
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षीने दबंगमधील तिच्या कास्टिंगबद्दल सांगितले होते. ती म्हणाली होती की, माझ्यासाठी हे खूप अचानक झाले. मी फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत होते. मी त्यावेळी वजन कमी केलेले किशोरवयीन होते. मला चित्रपट करायचे आहेत का, असे कोणीही विचारले नव्हते. मला फक्त सांगितलं होतं की तू हे करत आहे.