पहिल्याच दिवशी सोनाक्षीला नणंदेनं रडवलं, अभिनेत्रीच्या सासरी नेमकं काय घडलं?; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 16:22 IST2024-06-25T16:21:41+5:302024-06-25T16:22:05+5:30
सात वर्षांच्या रिलेशनशीपनंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)ने जहीर इक्बाल(Zaheer Iqbal)सोबत रजिस्टर लग्न केले आहे. दरम्यान, सोनाक्षीचा सासरी गेल्यानंतरचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.

पहिल्याच दिवशी सोनाक्षीला नणंदेनं रडवलं, अभिनेत्रीच्या सासरी नेमकं काय घडलं?; व्हिडीओ व्हायरल
सात वर्षांच्या रिलेशनशीपनंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा(Sonakshi Sinha)ने जहीर इक्बाल(Zaheer Iqbal)सोबत रजिस्टर लग्न केले आहे. दोघांचे दोन दिवसांपूर्वी २३ जून रोजी लग्न झाले होते. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, सोनाक्षीचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री लग्नाचे विधी पार पाडताना रडताना दिसली होती.
वास्तविक, सोनाक्षी सिन्हाचा हा व्हिडिओ जहीर इक्बालची बहीण जन्नत वासीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये जन्नत तिचा भाऊ जहीर आणि वहिनी सोनाक्षीची नजर काढताना दिसत आहे. नणंदेचे हे प्रेम पाहून सोनाक्षी सिन्हा खूप भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. तिचे अश्रू पुसतानाही दिसली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सोनाक्षी सिन्हा स्काय ब्लू कलरच्या शरारा सूटमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. नजर काढल्यानंतर सोनाक्षीही तिच्या नणंदेला मिठी मारताना दिसली होती.
जहीर-सोनाक्षीने केलं रजिस्टर लग्न
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी हिंदू किंवा मुस्लिम रितीरिवाजानुसार नव्हे तर २३ जून रोजी नोंदणीकृत विवाह केला. यावेळी सोनाक्षीने तिच्या आईच्या लग्नाची साडी आणि दागिने परिधान केले होते. तर जहीर पांढऱ्या रंगाच्या चिकनकारी कुर्त्यामध्ये दिसला. दोघांचा हा लूक एकदम रॉयल दिसत होता.
लग्नानंतर दोघांनी शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील रेस्टॉरंटमध्ये ग्रँड रिसेप्शनही आयोजित केले होते. ज्यामध्ये सोनाक्षीने लाल रंगाची साडी नेसली होती. सलमान खान, काजोल, राजकुमार राव, रेखा, अदिती राव हैदरी आणि संजीदा शेख यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी रिसेप्शनला हजेरी लावली होती.