Sonakshi Sinha Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख ठरली, कोण आहे तिचा 'प्रिन्स' ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 13:20 IST2024-06-10T11:17:27+5:302024-06-10T13:20:47+5:30
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

Sonakshi Sinha Wedding : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा चढणार बोहल्यावर, लग्नाची तारीख ठरली, कोण आहे तिचा 'प्रिन्स' ?
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हाबॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भात अनेक चर्चा होत असतात. सध्या सोनाक्षी सिन्हाच्यालग्नाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. तिच्या लग्नाची तारीख ठरल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अभिनेत्रीच्या लग्नाची आणि तिचा मिस्ट्री मॅन कोण हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे
ज्येष्ठ अभिनेते व नवनिर्वाचित खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी सनई-चौघडे वाजणार आहेत. येत्या २३ जून रोजी मुंबईत सोनाक्षी सिन्हा लग्न करणार असल्याचं समोर आलं आहे. सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता झहीर इक्बालसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. 'इंडिया टुडे'ने सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचं लग्न २३ जूनला होणार असल्याचं वृत्त दिलं आहे. जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त 'हीरामंडी'च्या सर्व कलाकारांना लग्नासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाक्षी यो यो हनी सिंगसोबत 'कलास्टार' या गाण्यात दिसली होती. येत्या काही दिवसांत ती अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ' या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपटात पहायला आहे. झहीरबद्दल बोलायचं झालं तर सलमानने त्याला 'नोटबूक' चित्रपटातून लॉन्च केलं होतं. तर झहीरची बहीण सनम रतनसी बॉलिवूडमधील सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. सोनाक्षीसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी झहीर हा दाक्षिणात्य अभिनेत्री दीक्षा सेठ आणि बॉलिवूड अभिनेत्री सना सईदसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. शिवाय, जहीरच्या कुटुंबाचा दागिन्यांचा व्यापार आहे.