Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची जय्यत तयारी, लग्नाआधी स्पॉट झाला 'दुल्हेराजा', पाहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 16:33 IST2024-06-23T16:33:10+5:302024-06-23T16:33:43+5:30
सोनाक्षी आणि जहीरच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. लग्नाला अवघे काही तास बाकी असताना जहीर इक्बालला स्पॉट करण्यात आलं.

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी-जहीरच्या लग्नाची जय्यत तयारी, लग्नाआधी स्पॉट झाला 'दुल्हेराजा', पाहा व्हिडिओ
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सोनाक्षी आणि जहीर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. कोर्ट मॅरेज पद्धतीने ते दोघे लग्न करणार आहेत. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. सोनाक्षी आणि जहीरच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे.
लग्नाला अवघे काही तास बाकी असताना जहीर इक्बालला स्पॉट करण्यात आलं. जहीरला त्याच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन त्याचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत दुल्हे राजा कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. शर्ट आणि जीन्स परिधान करत डोक्यावर टोपी आणि डोळ्याला गॉगल लावल्याचं दिसत आहे. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं मुंबईत वेडिंग रिसेप्शन असणार आहे. यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहेत.
सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षी आणि जहीर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आज रजिस्टर मॅरेज करणार आहेत. त्यानंतर रिसेप्शन पार्टी दिली जाणार आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही हजर राहणार आहेत.
कोण आहे जहीर इक्बाल?
सोनाक्षीप्रमाणेच जहीरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाबरोबरच तो मॉडेलिंगदेखील करतो. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं होतं. जहीरचे वडील व्यावसायिक असून त्याचे सलमान खानशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत.