Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षीची लगीनघाई! लग्नाआधी 'रामायणा'मध्ये पार पडली खास पूजा, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 08:47 IST2024-06-23T08:47:08+5:302024-06-23T08:47:58+5:30
सिन्हा कुटुंबीयांकडून लाडक्या लेकीच्या लग्नाअगोदर खास पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोनाक्षी आणि सिन्हा कुटुंबीयांबरोबर ही पूजा पार पडली.

Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षीची लगीनघाई! लग्नाआधी 'रामायणा'मध्ये पार पडली खास पूजा, व्हिडिओ व्हायरल
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सोनाक्षी बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. कोर्ट मॅरेज पद्धतीने ते दोघे लग्न करणार आहेत. लग्नाआधी शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'रामायणा' या निवासस्थानी पूजा पार पडली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
एकुलत्या एक मुलीच्या लग्नासाठी शत्रुघ्न सिन्हा यांचं घर सजलं आहे. रामायणाला खास विद्युत रोषषाई करण्यात आली आहे. सोनाक्षीच्या लग्नापूर्वीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. तिच्या हातावर जहीर इक्बालच्या नावाची मेहेंदी रंगली आहे. सिन्हा कुटुंबीयांकडून लाडक्या लेकीच्या लग्नाअगोदर खास पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. सोनाक्षी आणि सिन्हा कुटुंबीयांबरोबर ही पूजा पार पडली. याचा व्हिडिओ विरल भय्यानी या इन्स्टाग्रामवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सोनाक्षी तिच्या आईबरोबर पूजा करत असल्याचं दिसत आहे.
सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षी आणि जहीर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत आज रजिस्टर मॅरेज करणार आहेत. त्यानंतर रिसेप्शन पार्टी दिली जाणार आहे. त्यांच्या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही हजर राहणार आहेत.