Sonakshi Sinha Wedding: झहीर इक्बालने सोनाक्षीला लग्नाचं गिफ्ट म्हणून दिली BMW! किंमत त्याच्या नेटवर्थएवढी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:17 AM2024-06-26T10:17:00+5:302024-06-26T10:18:12+5:30

लग्नानंतर सोनाक्षीचं सासरी जंगी स्वागत करण्यात आलं. तर जहीरने त्याची पत्नी सोनाक्षीला खास गिफ्टही दिलं आहे. सोनाक्षीला जहीरने BMW ही आलिशान कार गिफ्ट म्हणून दिली आहे.

Sonakshi Sinha Wedding Zaheer Iqbal gift actress BMW as a wedding gift worth rs 2cr | Sonakshi Sinha Wedding: झहीर इक्बालने सोनाक्षीला लग्नाचं गिफ्ट म्हणून दिली BMW! किंमत त्याच्या नेटवर्थएवढी

Sonakshi Sinha Wedding: झहीर इक्बालने सोनाक्षीला लग्नाचं गिफ्ट म्हणून दिली BMW! किंमत त्याच्या नेटवर्थएवढी

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत रविवारी(२३ जून) विवाह केला. लग्नानंतर त्यांचं वेडिंग रिसेप्शन मुंबईत पार पडलं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. सोनाक्षीच्या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. 

लग्नासाठी सोनाक्षीने तिच्या आईची ४४ वर्ष जुनी साडी नेसत अगदी साधा लूक केला होता. तर जहीरनेदेखील कुर्ता परिधान केला होता. वेडिंग रिसेप्शनला मात्र सोनाक्षीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. फिकट रंगाचा आणि भरजरी लेहेंग्याचा बॉलिवूड अभिनेत्रींचा ट्रेंड बदलत नववधू सोनाक्षीने लाल रंगाला पसंती दिली. वेडिंग रिसेप्शनसाठी सोनाक्षी लाल रंगाची साडी नेसून नववधूप्रमाणेच नटली होती. केसांत गजरा आणि मोजकेच दागिने परिधान करत तिने अगदी सिंपल लूक केला होता. तिने भांगेत कुंकूही भरलं होतं. नववधू सोनाक्षीच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

लग्नानंतर सोनाक्षीचं सासरी जंगी स्वागत करण्यात आलं. तर जहीरने त्याची पत्नी सोनाक्षीला खास गिफ्टही दिलं आहे. सोनाक्षीला जहीरने BMW ही आलिशान कार गिफ्ट म्हणून दिली आहे. BMW i7 ही इलेक्ट्रिक गाडी जहीरने सोनाक्षीला भेट म्हणून दिली आहे. या गाडीची किंमत जवळपास २ कोटींच्या घरात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जहीरचं नेटवर्थही तेवढंच आहे. 

सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षीप्रमाणेच जहीरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाबरोबरच तो मॉडेलिंगदेखील करतो. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं होतं. जहीरचे वडील व्यावसायिक असून त्याचे सलमान खानशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

Web Title: Sonakshi Sinha Wedding Zaheer Iqbal gift actress BMW as a wedding gift worth rs 2cr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.