Sonakshi Sinha Wedding: जावई असावा तर असा! लग्नानंतर जहीर पडला शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया, व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 09:23 IST2024-06-24T09:23:28+5:302024-06-24T09:23:56+5:30
सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर जहीरने शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या पाया पडत त्यांचे आशीर्वाद घेतले.

Sonakshi Sinha Wedding: जावई असावा तर असा! लग्नानंतर जहीर पडला शत्रुघ्न सिन्हा यांच्या पाया, व्हिडिओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी रविवारी(२३ जून) लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नातील एका व्हिडिओने मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत सोनाक्षी आणि जहीरबरोबर शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नीही दिसत आहे. या व्हिडिओत जहीर शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांच्या पाया पडताना दिसत आहे. लग्नानंतर जहीरच्या या कृतीचं कौतुक होत आहे. सासू सासऱ्यांच्या पाया पडल्यानंतर जहीर सोनाक्षीला किस करत असल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नातील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सोनाक्षी आणि जहीरने लग्नासाठी अगदी साधा लूक केल्याचं पाहायला मिळालं. सोनाक्षीने तिच्या आईची पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. केसांत गजरा माळत अगदी साध्या लूकमध्ये नववधू दिसली. तर जहीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरने मुंबईत वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षीप्रमाणेच जहीरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाबरोबरच तो मॉडेलिंगदेखील करतो. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं होतं. जहीरचे वडील व्यावसायिक असून त्याचे सलमान खानशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत.