"तुझ्या आई-बाबांचा..." नेटकऱ्यानं डिवोर्सवरून कमेंट करताच सोनाक्षीचा सॉलिड रिप्लाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 17:01 IST2025-04-17T17:00:42+5:302025-04-17T17:01:29+5:30

ट्रोलर्सची बोलती कशी बंद करायची हे 'शॉटगन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शत्रुघ्न सिन्हाच्या लेकीला चांगलंच ठाऊक आहे. 

Sonakshi Sinha’s Sharp Reply To Divorce Troll Goes Viral Says Pehle Tere Mummy Papa… | "तुझ्या आई-बाबांचा..." नेटकऱ्यानं डिवोर्सवरून कमेंट करताच सोनाक्षीचा सॉलिड रिप्लाय

"तुझ्या आई-बाबांचा..." नेटकऱ्यानं डिवोर्सवरून कमेंट करताच सोनाक्षीचा सॉलिड रिप्लाय

Sonakshi Sinha Slams Troll: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल (Zaheer Iqbal) हे कपल सतत चर्चेत येत असतं. अगदी काही महिन्यांपूर्वीच त्यांनी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरूवात केली. २३ जून २०२४ या दिवशी सोनाक्षी-जहीरने नोंदणी पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर मुंबईमध्ये रिसेप्शनचं आयोजन करीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना त्यांनी आमंत्रित केलं होतं. त्यांच्या लग्नाची मनोरंजनविश्वात चांगलीच चर्चा झाली. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तर काहींनी मात्र नाक मुरडलं.  सोनाक्षीवर आंतरधर्मीय विवाह केल्याने बरीच टीकाही झाली. तिच्या लग्नाला आता येत्या जून महिन्यात एक वर्ष पुर्ण होईल. पण, आजही मुस्लिम मुलाशी लग्न केल्यावरुन ट्रोल केलं जातं. सोनाक्षीही ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देताना दिसते. 

सोनाक्षी आणि जहीर अनेकदा त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. अशाच एका फोटोवर एका युजरने "तुमचाही लवकरच घटस्फोट होईल" अशी कमेंट करत ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ही कमेंट वाचून सोनक्षी चांगलीच भडकली. सोनाक्षीनं  "आधी तुझ्या आई-बाबांचा होईल, मग आम्ही करु... वचन देते", असं उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली. सोनाक्षीनं दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा होतेय. ट्रोलर्सची  बोलती कशी बंद करायची हे 'शॉटगन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शत्रुघ्न सिन्हाच्या लेकीला चांगलंच ठाऊक आहे. 


सोनाक्षी सिन्हा आणि जहीर यांनी सुमारे सात वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी सिन्हा आणि जहीर यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली आहे.  याआधीही दोघांनीही आपलं नातं जगाच्या नजरेपासून दूर ठेवलं होतं. सोनाक्षी आणि जहीर एकमेंकासोबत प्रचंड आनंदी असतात. दोघांचाही सुखाचा संसार सुरू आहे. दोघे कायम एकमेकांचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. 


सोनाक्षीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'काकुडा' चित्रपटात दिसली होती. आता लवकरच ती तेलुगु सिनेमातून साऊथ सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 'जटाधारा' सिनेमात सोनाक्षी दिसणार आहे.झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सिनेमात सोनाक्षीसह शिल्पा शिरोडकर, रेन अंजली, दिव्या वीज अशी स्टारकास्ट आहे. तर वेंकट कल्याण सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.  

Web Title: Sonakshi Sinha’s Sharp Reply To Divorce Troll Goes Viral Says Pehle Tere Mummy Papa…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.