'खामोश गर्ल' सोनाक्षी लैंगिक समस्येवर करणार जनजागृती, पहा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 07:47 PM2019-06-21T19:47:28+5:302019-06-21T19:48:01+5:30
खामोश गर्ल सोनाक्षी सिन्हा लैंगिक समस्येवर भाष्य करताना दिसणार आहे.
बॉलिवूडची 'खामोश गर्ल' सोनाक्षी सिन्हा लवकरच खानदानी शफाखाना चित्रपटात दिसणार आहे. तिने काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिला पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटातून रॅपर किंग बादशाह बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतोय.
खानदानी शफाखाना चित्रपटाचा पोस्टर शेअर करत सोनाक्षी सिन्हाने इंस्टाग्रामवर लिहिलं होतं की, 'मैं जितना बोलूंगी लोगों को उतनी ही शरम आनी है.' खानदानी शफाखाना हा कॉमेडी सिनेमा असून यात सोनाक्षी बेबी बेदीची भूमिका साकारताना दिसणार आहे.
खानदानी शफाखाना चित्रपटाचा ट्रेलर पाहता चित्रपटात एका अनोख्या पद्धतीने लैगिंक समस्येवर भाष्य करण्यात आलं आहे. दरम्यान चित्रपटात अभिनेता वरुण सोनाक्षीच्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. सोनाक्षीचा मामा खानदानी शफाखाना सोनाक्षीच्या नावावर करतो. त्यानंतर सोनाक्षी लैगिंक समस्यांवर औषधे विकण्यास सुरुवात करते. परंतु सामाजात कोणीही या समस्यांवर उघडपणे बोलण्यास तयार नसते. समाजाने या समस्यांवर उघडपणे बोलण्यासाठी सोनाक्षी प्रयत्न करताना पहायला मिळते आहे.
खानदानी शफाखाना या चित्रपटात रॅपर बादशाहचे कोका हे गाणे असून या गाण्यात सोनाक्षी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शिल्पी दासगुप्ताने केले आहे. हा चित्रपट २६ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.