सोनाक्षीला आठवतेय बालपण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2016 04:46 AM2016-05-07T04:46:06+5:302016-05-07T10:16:50+5:30

सोनाक्षीने ती लहान असताना फॅमिली फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

Sonakshi thinks childhood | सोनाक्षीला आठवतेय बालपण

सोनाक्षीला आठवतेय बालपण

googlenewsNext
लपण ते बालपण असते. कशाचीच चिंता नाही. मुक्तपणे जगण्याचा तो काळ. मोठे झाल्यावर दुनियादारीशी जुळून घेताना नाकीनऊ येते. त्यामुळे कधीकधी वाटते ‘बालपण देगा देवा’.

अशीच काहीशी अवस्था आपल्या ‘दबंग गर्ल’ सोनाक्षीची झालेली दिसतेय. नुकतेच तिने ती लहान असताना फॅमिली फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

या क्यूट फोटोमध्ये सोनाक्षी एकदम निरागस बाळ दिसत आहे. छोटूशी सोनाक्षी या फोटोत आईवडिल शत्रघ्न व पूनम सिन्हा आणि भाऊ लव व कुशसोबत आहे.

बालपणातील आठवणीत रमून गेलेल्या सोनाक्षीने या फोटोसोबत लिहिले की, लहानपणी माझी आई मला तिच्या सारखे कपडे घालून माझा मेकअप करायची. ते दिवस आठवले आजही मला पुन्हा लहान व्हावेसे वाटते.

खरंय म्हणा, बालपणात कोणाला रमायला आवडणार नाही. प्रियंका आणि दीपिकासुद्धा अधुनमधून त्यांच्या बालपणातील फोटो चाहत्यांशी शेअर करत असतात. सोनाक्षी सध्या ‘फोर्स 2’ आणि ‘अकिरा’मध्ये व्यस्त आहे. त्यानंतर ती अक्षय कुमारसोबत ‘नमस्ते इंग्लंड’मध्ये दिसणार आहे.

Web Title: Sonakshi thinks childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.