कॅन्सरला हरवून कामावर परतली सोनाली बेंद्रे!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 11:06 AM2019-02-03T11:06:32+5:302019-02-03T11:07:03+5:30

होय,कॅन्सरला हरवून सोनाली कामावरही परतली आहे. सोनालीने स्वत: ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

sonali bendre back on lights camera action this instagram post is proof | कॅन्सरला हरवून कामावर परतली सोनाली बेंद्रे!

कॅन्सरला हरवून कामावर परतली सोनाली बेंद्रे!

googlenewsNext
ठळक मुद्देगत वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाय ग्रेड कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती.

गत वर्षी सोनाली बेंद्रेला कॅन्सरचे निदान झाले आणि चाहत्यांत चिंता पसरली. कॅन्सरच्या निदानानंतर सोनाली उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाली. या काळात सोनालीने अतिशय धैर्याने या आजाराशी झुंज दिली आणि अखेर पूर्णपणे स्वस्थ होऊन भारतात परतली. आता तर ती कामावरही परतली आहे. होय, सोनालीने स्वत: ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.


इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत तिने ही माहिती दिली. दीर्घकाळ आराम केल्यानंतर सेटवर परतते आहे. अनेक पद्धतीने आणि अनेक पातळ्यांवर परीक्षा दिली. एक विचित्र अनुभव आहे. कामावर परतण्याचा अभिमान वाटतोय.  हा क्षण शब्दांत मांडता येणार नाही. कॅमेºयाला पुन्हा एकदा सामोरे जाणे आणि भाव-भावनां जिवंत करणे एक सुंदर अनुभव आहे. गेल्या काही महिन्यांत माझ्या भाव-भावना लोप पावत चालल्या होत्या. आजचा हा दिवस माझी मदत करणारा आहे,असे सोनालीने लिहिले आहे.


निश्चितपणे सोनालीचे हे शब्द अनेकांसाठी प्रेरणादायी आहेत.  सकारात्मकता, संयम आणि पराकोटीचे धैर्य या जोरावर सोनालीने कॅन्सरला परतवून लावले. आता तिच्या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांना प्रतीक्षा असणार आहे.




गत वर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाय ग्रेड कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. यानंतर उपचारांसाठी ती न्यू-यॉर्कमध्ये रवाना झाली होती. त्यापूर्वी दीर्घकाळापासून सोनालीला शारिरीक वेदना  होत्या. पण तिने या वेदनांकडे दुर्लक्ष केले.  वेदना असह्य झाल्या तोपर्यंत हा आजार चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचला होता. 

Web Title: sonali bendre back on lights camera action this instagram post is proof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.