जबाबदारीचे जरा तरी भान ठेवा! राम कदमांच्या ‘त्या’ ट्विटने संतापला सोनाली बेंद्रेचा पती!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 09:49 AM2018-09-09T09:49:49+5:302018-09-09T09:51:51+5:30
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अमेरिकेत उपचार घेत आहे. बॉलिवूडसह अनेक चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर अमेरिकेत उपचार घेत आहे. बॉलिवूडसह अनेक चाहते तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत. मात्र, असे असताना अलिकडे भाजप नेते राम कदम यांनी सोनालीच्या निधनाचे बेजबाबदार ट्विट करुन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. त्याच्या या बेजबाबदार ट्विटमुळे सोनाली बेंद्रेचे पती गोल्डी बहेल चांगलेच संतापले आहेत.
भाजपचे नेते राम कदम यांनी सोशल मीडियावर सोनाली बेंद्रेच्या निधनाचे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी सोनालीला श्रद्धांजली वाहिली होती़ नंतर ही अफवा असल्याचे कुणीतरी त्यांच्या लक्षात आणून दिले आणि त्यांना उपरती झाली. यानंतर ही अफवा असल्याचे सांगत, त्यांनी ते ट्विट डिलिट करत सारवासारव करण्याचे प्रयत्न केलेत. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावरील अनेक वापरकर्त्यांनी त्याचा स्क्रिनशॉट काढून राम कदम यांना जाब विचारण्यात सुरुवात केली होते. त्यांचे ते ट्विट थोड्याच वेळात व्हायरल झाले होते. हा सगळा प्रकार सोनालीच्या चाहत्यांनांच नाही तर सोनालीच्या जवळच्यांनाही दुखावून गेला़ सोनालीचे पती गोल्डी बहेल यामुळे कमालीचे संतापले आहेत.
I appeal to all to please use social media more responsibly. Let us not believe in rumours and spread them, unnecessarily hurting the sentiments of those involved. Thank you.
— goldie behl (@GOLDIEBEHL) September 8, 2018
सोशल मीडिया वापरकर्त्यांना जबाबदारी करा़ अफवेवर विश्वास ठेवून आणि त्या पसरवून संबंधितांना नाहक त्रास देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांना टोला अर्थातचं राम कदम यांच्यासारख्यांना आहे.
दरम्यान अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या न्यूयॉर्कमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या आजाराबाबतची प्रत्येक अपडेट सोशल मीडियावरून चाहत्यांना देत आहे.सोनाली उपाचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे म्हटले जात आहे. सोनालीचे पती दिग्दर्शक गोल्डी बहलने ट्वीट करून तिच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. ''सोनालीची प्रकृती चांगली असून ती उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. आम्हाला सगळ्यांना मोठा प्रवास करायचा आहे. सगळे काही ठीक होईल अशी आम्हाला आशा आहे'', असे ट्विट त्यांनी केले होते.