"माझा हात मोडला", फ्रॅक्चर हात घेऊन एअरपोर्टवर दिसली सोनाली बेंद्रे, व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत
By कोमल खांबे | Updated: March 26, 2025 12:06 IST2025-03-26T12:06:02+5:302025-03-26T12:06:42+5:30
सोनालीच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडणारी बातमी समोर आली आहे. सोनाली बेंद्रेच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे.

"माझा हात मोडला", फ्रॅक्चर हात घेऊन एअरपोर्टवर दिसली सोनाली बेंद्रे, व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत
बॉलिवूडची ब्युटिफूल अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मराठमोळ्या सोनालीने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने बॉलिवूडचा एक काळ गाजवला. ९०च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी सोनाली एक होती. पण, सध्या मात्र सोनालीच्या चाहत्यांच्या चिंतेत भर पडणारी बातमी समोर आली आहे. सोनाली बेंद्रेच्या हाताला फ्रॅक्चर झालं आहे.
सोनालीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सोनालीच्या हाताला दुखापत झाल्याचं दिसत आहे. तिच्या हाताला फ्रॅक्चरही झालं आहे. या अवस्थेत तिला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं होतं. विरल भय्यानी या पापाराझींच्या इन्स्टाग्राम पेजवरुन सोनालीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत सोनालीला असं पाहून पापाराझी तिला काय झालं ते विचारताना दिसत आहेत. तेव्हा सोनाली त्यांना "माझा हात मोडला" असं सांगत असल्याचं दिसत आहे. पापाराझी सोनाली काळजी घेण्यास सांगत आहेत.
सोनालीच्या हाताला दुखापत नक्की कशामुळे झाली, हे अद्याप कळू शकलेलं नाही. अभिनेत्रीनेही याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसंच तिला लवकर बरे होण्यासाठी ते प्रार्थनाही करत आहेत. "काळजी घ्या", "काय झालं? लवकर छान अॅक्टिव्ह हो", "हाताला काय झालं?", "सोनालीला काय झालं?" अशा कमेंट चाहत्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.