कॉलेजच्या दिवसात सोनाली बेंद्रे करायची लोकल ट्रेनने प्रवास, आठवणींना दिला उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 06:36 PM2023-10-20T18:36:53+5:302023-10-20T18:37:30+5:30

Sonali Bendre : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने मुंबई लोकलने केलेल्या प्रवासाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कॉलेजला असताना सोनाली ही लोकल ट्रेनने प्रवास करायची.

Sonali Bendre used to travel by local train during her college days, bringing back memories | कॉलेजच्या दिवसात सोनाली बेंद्रे करायची लोकल ट्रेनने प्रवास, आठवणींना दिला उजाळा

कॉलेजच्या दिवसात सोनाली बेंद्रे करायची लोकल ट्रेनने प्रवास, आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने मुंबई लोकलने केलेल्या प्रवासाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कॉलेजला असताना सोनाली ही लोकल ट्रेनने प्रवास करायची. सोनालीच्या आईने लोकलने प्रवास करतेवेळी काय काळजी घ्यायची याच्या काही सूचना तिला दिल्या होत्या. महिलांच्या डब्यातून प्रवास करणे, अंधार पडल्यानंतर एकटीने प्रवास करू नये अशा अनेक गोष्टी महिला, लोकल ट्रेनने प्रवास करताना लक्षात ठेवत असतात. 

लोकलने प्रवास करताना काय काळजी घ्यावी हे सगळ्या वयोगटातील महिलांना चांगले ठाऊक असते. सुरक्षित प्रवासासाठी आणखी काय करावे, याची माहिती देण्यासाठी एका विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. 'खाकी मे सखी' असे या उपक्रमाचे नाव असून सोनाली बेंद्रे हिने या उपक्रमाची ओळख करून दिली आहे. हा उपक्रम मुंबई रेल्वे पोलीस आणि 'कोटो' या सोशल कम्युनिटी प्लॅटफॉर्मने संयुक्तरित्या राबवण्याचे ठरवले आहे. 

खाकी वर्दीतील महिला पोलीस या आपल्या सखीप्रमाणे असून संकटसमयी, अडचणीच्या प्रसंगी आपण त्यांना मदतीसाठी हाक मारू शकतो ही संकल्पना रुजवण्याचा या उपक्रमामार्फत प्रयत्न केला जात आहे. कोटो कम्युनिटी 'खाकी मे सखी' हा एक ऑनलाईन मंच असून यावर महिला आपली मते, आपल्या चिंता, समस्या खुलेपणामे मांडू शकतात.  अवेळी प्रवास करताना वाटणारी भीती, लैंगिंक छळ, पुरुषांच्या डब्यातून प्रवास करताना इतरांमुळे वाटणारा संकोच यासारख्या समस्या महिला प्रवासी या मंचाद्वारे मांडू शकतात. 
 

Web Title: Sonali Bendre used to travel by local train during her college days, bringing back memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.