Sonam Kapoor नं लेकाला ब्रेस्टफीड करत केला मेकअप, चाहते करतायेत कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 05:57 PM2022-10-15T17:57:10+5:302022-10-15T17:57:41+5:30
Sonam Kapoor : सोनम सध्या सिनेइंडस्ट्रीपासून दूर असून कुटुंब आणि मुलगा वायुसोबत वेळ व्यतित करत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) नुकतीच आई झाली आहे. सोनम सध्या सिनेइंडस्ट्रीपासून दूर असून कुटुंब आणि मुलगा वायुसोबत वेळ व्यतित करत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सोनम कपूरने तिच्या करवा चौथ सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये सोनम कपूर मेकअप रूममध्ये तिचा मुलगा वायुला स्तनपान करताना दिसत आहे. हे पाहून चाहते सोशल मीडियावर सोनम कपूरचे कौतुक करत आहेत. या व्हिडिओपूर्वी सोनम कपूरने लेहेंग्यातले काही फोटो शेअर केले होते.
हा व्हिडिओ शेअर करत सोनम कपूरने लिहिले की, 'माझ्या टीमसोबत खऱ्या जगातल्या लोकांना भेटून खूप छान वाटतं. आपल्या होम ग्राउंडवर परतणे खूप छान आहे. लव्ह यू मुंबई.' यावर्षी सोनमने करवा चौथचा उपवास केला नाही. सोनमने तिच्या एका पोस्टमध्ये सांगितले की, ती करवा चौथचा उपवास करत नाही कारण आनंदचा यावर विश्वास नाही. तथापि, तिची आई सुनीता कपूर दरवर्षी करवा चौथच्या दिवशी मोठ्या पूजेचे आयोजन करते, ज्यात बी-टाउन सेलेब्स उपस्थित असतात.
सोनम कपूरच्या व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'सोनम आजच्या मुलींसाठी प्रेरणास्थान आहे.' दुसरीकडे, सोनम कपूरचा पती आनंदने कमेंटमध्ये लिहिले की, 'मम्मा यासाठी बनवली आहे.' सोनम कपूरच्या करवा चौथ लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने लेहेंगाच्या स्टाईलमध्ये पिंक कलरची सिल्क साडी नेसली होती. सोनमने साडीसोबत हिरवा ब्लाउज घातला होता आणि लूक पूर्ण करण्यासाठी सोनमने गळ्यात हार आणि कानातले घातले होते.
सोशल मीडियावर चाहते सोनम कपूरच्या मल्टीटास्किंग कौशल्याचे कौतुक करत आहेत. मुलाच्या जन्मानंतर २ महिन्यांतच सोनमने स्वतःला फिट केले. सोनम कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती आगामी काळात 'ब्लाइंड' या चित्रपटात दिसणार आहे.