Sonam Kapoor : हे काय भलतेच! सोनम कपूरची फॅशन पाहून नेटकऱ्यांना आली 'शोले'च्या ठाकुरची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:46 AM2023-02-28T11:46:25+5:302023-02-28T11:47:28+5:30
बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सोनम कपूरला 'फॅशन आयकॉन' म्हणले जाते.
Sonam Kapoor : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सोनम कपूरला 'फॅशन आयकॉन' म्हणले जाते. कोणत्याही सोहळ्यात सोनमचे आऊटफिट लक्ष वेधून घेते. कधी तिचे ड्रेस कमालीचे सुंदर असतात तर कधी ती तिच्या स्टाईलमुळेही ट्रोलही होते. नुकत्याच एका व्हायरल व्हिडिओमध्ये सोनम प्रचंड ट्रोल होत आहे. इतकी की तिची तुलना थेट 'शोले' च्या ठाकुरसोबत केली आहे.
सोनम कपूरने मुंबईतील मॅरियट येथे 'शादी' कलेक्शन फंक्शनसाठी उपस्थिती लावली. यामध्ये तिने फॅशन डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेल्या आऊटफिटमध्ये दिसली. तिने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस परिधान केला आहे. तर सिल्व्हर रंगाचे वर्क असलेले जॅकेट तिने खांद्यावर ओढून घेतले आहे. सोनमचे हात आतमध्ये असून जॅकेट न घालता तिने ते नुसतेच ओढलेले दिसते.
सोनमची ही स्टाईल पाहून नेटकऱ्यांना शोले सिनेमातील ठाकूरचीच आठवण झाली. शोलेमध्ये संजीव कुमार यांनी ठाकुरची भूमिका साकारली आहे. त्यात ठाकुरचे दोन्ही हात नसतात आणि त्याने खांद्यावर शाल ओढलेली असते. झालं तर सोनमही तशाच लुकमध्ये दिसत आहे असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले आहे.
सोनम कपूर बऱ्याच काळापासून चित्रपटातून गायब आहे. तिने सहा महिन्यांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्याचे नाव 'वायू' ठेवण्यात आले. सध्या सोनम मुलाच्या संगोपनात व्यस्त आहे.