‘नीरजा’साठी पुरस्कार न मिळाल्याने सोनम कपूर झाली आलिया भट्टवर नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 07:49 AM2017-01-30T07:49:31+5:302017-01-30T13:21:43+5:30
कलाकार हा प्रशंसेचा भूकेला असतो. त्याला स्तुती खूप प्रिय असते. पुरस्कार किंवा अवॉर्डस् हे त्याचेच प्रतीक असतात. त्यामुळे मन ...
क ाकार हा प्रशंसेचा भूकेला असतो. त्याला स्तुती खूप प्रिय असते. पुरस्कार किंवा अवॉर्डस् हे त्याचेच प्रतीक असतात. त्यामुळे मन लावून केलेल्या कामासाठी जर पुरस्कार मिळाला तर तो कलाकार स्वर्ग गाठल्यागत समाधानी होतो. परंतु जेव्हा पुरस्काराचा मुख्य दावेदार असूनही तो मिळत नाही तेव्हा मात्र हिरमोड होतो.
अशीच काहीच स्थिती बॉलीवूडची ‘फॅशन आयकॉन’ सोनम कपूरची आहे. गेल्या वर्षी ‘नीरजा’ सिनेमात करिअर बेस्ट अभिनय करत सोनमने समीक्षक आणि पे्रक्षकांची वाहवाह मिळवली. संपूर्ण वर्षभर मुख्य अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी तिचे नाव निश्चित मानले जात होते. त्यामुळे सहाजिकच तिच्यादेखील अपेक्षा वाढल्या असणार.
मात्र नुकतेच एका अवॉर्ड सोहळ्या सोनमला डावलून आलिया भट्टला बेस्ट अॅक्ट्रेसचा पुरस्कार देण्यात आला. यावरून पुन्हा एकदा पुरस्कार सोहळ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. सोनमने अप्रत्यक्षपणे या निर्णयावर आक्षेप घेत आयोजकांच्या हेतूवर शंका उपस्थित केली.
► ALSO READ: अवॉर्ड न मिळाल्यामुळे हर्षवर्धन कपूरचा दिलजीत दोसांझवर तळतळाट
ती म्हणाली की, ‘मी जिंकू शकले नाही याचे दु:ख करण्याची काही गरज नाही. कारण त्यांना जे योग्य आणि बेस्ट वाटले त्याला त्यांनी पुरस्कार दिला. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. फक्त नामांकन मिळूनही मी आनंदीत आहे. आता पुरस्कार म्हणजे सर्व काही नसते. प्रेक्षकांची पसंती माझ्यासाठी महत्त्वाची आहे. लोकांना माझा अभिनय आवडला आणि त्यांना वाटते की, मी पुरस्कारची खरी मानकरी आहे तर यातच मी सर्व काही मिळवलेय.’
सोनमचा भाऊ हर्षवर्धन कपूरनेदेखील ‘बेस्ट अॅक्टर डेब्यू’ पुरस्कार न मिळाल्याने दिलजीत दोसांजवर आक्षेप घेतला होता. ‘दिलजीनने या आधी पंजाबी चित्रपटांत काम केले असल्याने तो या पुरस्कारासाठी वैध ठरत नाही’, असे तो म्हणाला होता. नंतर त्याने या प्रकरणावर माफीसुद्धा मागितली.
संगीतकार अमाल मलिकनेसुद्धा फेसबुकवर पोस्ट लिहून अवॉर्डस् शोजची खरडपट्टी केली होती. नामांकन निवडताना आयोजक काय विचार करतात हेच कळत नसल्याची खंत त्याने व्यक्ती केली होती. ‘बागी’सारख्या सुमार सिनेमाच्या संगीतसाठी मला नामांकन दिले जाते म्हणजे कमालच आहे, असेही तो म्हणाला होता.
►ALSO READ: अमाल मलिकने काढली हिंदी अवॉर्ड्सची औकात!