सोनम कपूरला 39 व्या वाढदिवशी पतीकडून मिळालं खास गिफ्ट, अभिनेत्रीनं चाहत्यांना दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 08:54 AM2024-06-10T08:54:22+5:302024-06-10T08:55:17+5:30

सोनम कपूर हिनं 9 जून रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा केला.

Sonam Kapoor Gets Special Gift From Husband Anand Ahuja On 39th Birthday | सोनम कपूरला 39 व्या वाढदिवशी पतीकडून मिळालं खास गिफ्ट, अभिनेत्रीनं चाहत्यांना दाखवली झलक

सोनम कपूरला 39 व्या वाढदिवशी पतीकडून मिळालं खास गिफ्ट, अभिनेत्रीनं चाहत्यांना दाखवली झलक

Sonam Kapoor 39th Birthday : अभिनेत्री सोनम कपूर हिने आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये हिट भूमिका केल्या. सोनम कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच सोनम कपूर हिचा 39 वा वाढदिवस पार पडलाय. सोनम कपूर हिनं 9 जून रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा केला. चाहते हे मोठ्या प्रमाणात सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. सोनमला पतीकडून वाढदिवसानिमित्त खास गिफ्ट मिळाले. 

सोनम कपूरनं पती आनंद आहुजाकडून मिळालेली खास गिफ्टचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. पतीकडून सोनमला तिच्या वाढदिवशी रवींद्रनाथ टागोरांचे 'गीतांजली' हे तिचे सर्वात आवडते पुस्तक मिळाले आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिले, 'माझ्या  नवऱ्याने मला वाढदिवसाची भेट दिली... टागोरांच्या गीतांजलीची इंग्रजीत अनुवादित झालेली ही पहिली आवृत्ती. धन्यवाद आनंद.  मला माहित नाही की मी असं काय केलं होतं, ज्यामुळे तु मला मिळाला'.

सोनमच्या वाढदिवसानिमित्त तिची बहिण रिया कपूरनं आणि तिच्या जवळच्या मित्र -मैत्रिणीनी तिला सुंदर सरप्राईज दिलंय. सोमननं आपला वाढदिवस स्कॉटलंडमध्ये साजरा केला.  रिया कपूरनं वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली.  वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर सोनम शेवटची 7 जुलै 2023 रोजी रिलीज झालेल्या क्राईम थ्रिलर 'ब्लाइंड'मध्ये दिसली होती. लवकरच सोनम 'बॅटल फॉर बिटोरा'मध्ये दिसणार आहे.


 

Web Title: Sonam Kapoor Gets Special Gift From Husband Anand Ahuja On 39th Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.