तू अनिल कपूरची मुलगी नसती तर...! सुशांतबद्दल केलेल्या ट्विटवर नेटक-यांनी घेतला सोनम कपूरचा खरपूस समाचार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 10:49 AM2020-06-16T10:49:39+5:302020-06-16T10:53:31+5:30
सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाटून आला आणि यात अभिनेत्री सोनम कपूरने उडी घेतली.
बॉलिवूडचा मस्तमौला अभिनेता सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नाही. रविवारी सुशांतने गळफास लावून आत्महत्या केली आणि प्रत्येकजण हळहळला. त्याच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. तूर्तास सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काल कंगना राणौतने सुशांतच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर तिखट शब्दांत टीका केली होती. तिच्या टीकेनंतर घराणेशाहीचा वाद पुन्हा एकदा उफाटून आला आणि यात अभिनेत्री सोनम कपूरने उडी घेतली. तिने ट्विट केले आणि मग काय, या ट्विटमुळे सोनम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.
Blaming a girlfriend , ex girlfriend, family , colleagues for someone’s death is ignorant and fucking mean spirited.
— Sonam K Ahuja (@sonamakapoor) June 15, 2020
‘एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंड, कुटुंबीय आणि त्याच्यासोबत काम करणा-या लोकांना दोष देणे चुकीचे आहे,’ असे ट्विट सोनमने केले. तिचे हे ट्विट वाचून नेटकरी भडकले. मग काय त्यांनी सोनमला नाही नाही ते सुनावले.
Nepotism ki sabse gandi outcome ko sach kadva lag gaya hai shayad.
— Madhur (@ThePlacardGuy) June 15, 2020
अनेकांनी सोनमच्या या ट्वीटवरून तिच्यावर टीका केली. हा गर्लफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंडचा मुद्दा नाहीच तर बॉलिवूडमधल्या नेपोटिझमला दोष दिला जात आहे, अशा शब्दांत नेटक-यांनी सोनमला खडसावले. एका युजरने तर थेट सोनमच्या अभिनयक्षमतेवर बोट ठेवले.
no one blaming girlfriend and ex, everyone blaming nepotism.
— sharmaji ka ladkaa (@pranjultweet) June 15, 2020
‘अनिल कपूर यांची मुलगी नसतीस तर तू साफसफाईचे काम करत असतीस,’ असे या युजरने लिहिले. एकंदर काय तर सुशांतच्या मृत्यूवर ट्विट करणे सोनमला चांगलेच महागात पडले.
अगर अनिल कपूर की बेटी ना होती तो किसी घर पे झाडू पोछा लगा रही होती @sonamakapoor
— Akash GOYAL 100% FB (Stay Home🏡 Stay Safe🙋♂) (@Real__Akash) June 15, 2020
याआधीही अनेकदा सोनम अशाचप्रकारे ट्रोल झाली आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली सोनम तिच्या फॅशनसोबतच परखड बोलण्यासाठीही ओळखली जाते. पण तूर्तास सुशांतच्या मृत्यूने चाहते धक्क्यात असताना सोनमचे बोल नेटक-यांना रूचले नाही.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. त्याने नैराश्यात आत्महत्या केली असे म्हटले जात असले तरी तो बॉलिवूडच्या नेपोटिझमचा बळी ठरला, असे अनेक लोक मानत आहेत. कंगनाने तर सुशांतची आत्महत्या नव्हतीच तर हा प्लान मर्डर आहे, असे म्हटले आहे. सुशांतला बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा समाना करावा लागला होता. त्याला कधीच कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळेच त्याने नैराश्यात हे पाऊल उचलले असल्याचे अनेकांचे मत आहे.