सोनम कपूरने शेअर केलेली पोस्ट पाहून भडकले युजर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 10:11 AM2019-03-01T10:11:48+5:302019-03-01T10:13:07+5:30

पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर उभय देशांत तणावाचे वातावरण आहे. अशात अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि सोनम ट्रोल झाली.

sonam kapoor promotes india and pakistan peace with plagiarised post gets trolled | सोनम कपूरने शेअर केलेली पोस्ट पाहून भडकले युजर्स!

सोनम कपूरने शेअर केलेली पोस्ट पाहून भडकले युजर्स!

googlenewsNext
ठळक मुद्देसोनम कपूर ही आपल्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. त्यामुळे यापूर्वीही अनेकदा ती ट्रोल झालीय.

पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्ल्यानंतर उभय देशांत तणावाचे वातावरण आहे. अशात अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि सोनम ट्रोल झाली. ‘ह्युमन ऑफ हिंदुत्व’ या फेसबुक पेजवरची पोस्ट सोनमने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. या पोस्टमध्ये कट्टरवाद्यांबद्दल लिहिले होते.

‘पाकिस्तानात काही कट्टरवादी मुस्लिम आहेत. तर भारतात काही कट्टर हिंदू. जे द्वेषाची भाषा बोलतात. या दोन्ही कट्टरवाद्यांना युद्ध हवे आहे. पण या युद्धाच्या परिणामांची त्यांना चिंता नाही. दोन्ही देशात सामान्य माणसं आहेत. ज्यांना शांती हवी आहे. जे नोकरी करून आपल्या मुलांचे योग्य पालनपोषण करू इच्छितात...’, अशा आशयाची ही पोस्ट सोनमने शेअर केली आणि लोकांनी दिला ट्रोल केले. अनेकांनी दिला हिंदूविरोधी ठरवले.





काही तर तिची तुलना थेट पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकसोबत केली. ‘आज सोनमने हिंदूंची दहशतवाद्यांशी तुलना करून आपली पातळी दाखवली,’ अशा शब्दांत एका युजरने तिला ट्रोल केले. सोनमने शेअर केलेल्या या पोस्टच्या मूळ लेखकाने मात्र सोनमची बाजू घेत तिचा बचाव केला.



सोनम कपूर ही आपल्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. त्यामुळे यापूर्वीही अनेकदा ती ट्रोल झालीय. मध्यंतरी सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगला कंटाळून सोनमने ट्विटरवरून ब्रेक घेतला होता. ‘काही काळासाठी ट्विटरपासून दूर जातेय. येथे प्रचंड नकारात्मकता आहे. सर्वांना प्रेम...,’असे ट्विट तिने केले होते. ट्विटर सोडण्याच्या निर्णयापूर्वी सोनमने मुंबईतील खराब रस्त्यांवर आणि वाढत्या प्रदूषणावर पोस्ट टाकली होती. या पोस्टवरून तिच्यात आणि एका ट्विटर युजरमध्ये चांगलीचं जुंपली होती. यानंतर सोनमने ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला होता. तिने ट्विटर सोडल्यानंतर तर जणू युजर्सला आणखीच तेव चढला होता. ‘बहन हम तुम्हे जरा भी मिस नहीं करेंगे, मौका मिले तो होली दीपावली में आते रहना,’असे युजरने लिहिले होते.

Web Title: sonam kapoor promotes india and pakistan peace with plagiarised post gets trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.