सोनमने धुडकावली होती मणिरत्नमची ऑफर; 'या' कारणामुळे रिजेक्ट केला सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 10:20 AM2024-06-11T10:20:48+5:302024-06-11T10:21:11+5:30

Sonam kapoor: प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचे आजवर अनेक सिनेमा सुपरहिट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्न करत असतो. मात्र, सोनमने चक्क त्यांच्या सिनेमाची ऑफर धुडकावली.

sonam-kapoor-rejected-mani-ratnam-kadal-anil-kapoor-wanted-her-to-take-up-the-project | सोनमने धुडकावली होती मणिरत्नमची ऑफर; 'या' कारणामुळे रिजेक्ट केला सिनेमा

सोनमने धुडकावली होती मणिरत्नमची ऑफर; 'या' कारणामुळे रिजेक्ट केला सिनेमा

बॉलिवूडची फॅशनिस्टा म्हणून नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर (sonam kapoor) . कोणतीही फॅशन सोनम बिनधास्तपणे कॅरी करते त्यामुळे तिची नेटकऱ्यांमध्ये कायम चर्चा असते. गेल्या काही काळापासून सोनम इंडस्ट्रीपासून दूर आहे. मात्र, तिच्याविषयीचे किस्से कायम चाहत्यांमध्ये रंगतात. आजवर सोनमने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, तिला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यामध्येच सोनमने चक्क मणिरत्नम (Mani Ratnam) यांच्या सिनेमाची ऑफर धुडकावून लावली होती.

प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांचे आजवर अनेक सिनेमा सुपरहिट झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी प्रत्येक कलाकार प्रयत्न करत असतो. मात्र, सोनमने चक्क त्यांच्या सिनेमाची ऑफर धुडकावली. विशेष म्हणजे सोनमने हा सिनेमा करावा अशी अनिल कपूरचीही इच्छा होती. मात्र, तिने कोणाचंही ऐकलं नाही.

मणिरत्नम यांचा 'कदल' हा सिनेमा अनेकांना ठावूक असेल. २०१३ मध्ये आलेल्या या सिनेमासाठी सोनमला विचारणा करण्यात आली होती. मात्र, तिने एका किरकोळ कारणामुळे हा सिनेमा रिजेक्ट केला. रिपोर्ट्सनुसार, लँग्वेज बॅरिअरमुळे सोनमने हा सिनेमा रिजेक्ट केला.  लँग्वेज बॅरिअरमुळे त्याचा निगेटिव्ह परिणाम होईल असं तिला वाटत होतं. म्हणून तिने या सिनेमात काम करण्यास नकार दिला.

सोनमने मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये कदल रिजेक्ट करण्याविषयी तिला काही प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, तिने मणिरत्नम यांच्याविषयी भाष्य करणं टाळलं. ''प्लेअरनंतर मला काही तरी चांगलं काम करायचं होतं. पण, नेमकं काय हे मी ठरवलं नव्हतं'', असं सोनम या मुलाखतीमध्ये म्हणाली होती.

दरम्यान, मणिरत्नम यांचा 'कदल' हा सिनेमा २०१३ मध्ये रिलीज झाला. या सिनेमात गौतम कार्तिक, अर्जुन सरजा, अरविंद स्वामी, तुलासी नायर आणि लक्ष्मी मंचु ही कलाकार मंडळी झळकली होती. तर, सोनमने २००७ मध्ये संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरिया' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं.

Web Title: sonam-kapoor-rejected-mani-ratnam-kadal-anil-kapoor-wanted-her-to-take-up-the-project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.