सोनम कपूरने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पला म्हटले मूर्ख!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2018 03:28 PM2018-03-09T15:28:26+5:302018-03-09T20:58:34+5:30
अभिनेत्री सोनम कपूर हिने जगातील सर्वात बलाढ्य असलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पला चक्क मूर्खच म्हटले आहे. सोनम कपूरने म्हटले ...
अ िनेत्री सोनम कपूर हिने जगातील सर्वात बलाढ्य असलेल्या अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पला चक्क मूर्खच म्हटले आहे. सोनम कपूरने म्हटले की, ‘ट्रम्प यांना भारताकडून काहीतरी शिकायला हवे.’ सोनम कपूर ट्रम्प यांच्याबद्दल खूपच नाराज असल्याचे दिसून आले. जेव्हा तिच्या नाराजीचे मुख्य कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सोनमचा संताप झाल्याचे समोर आले. डोनाल्ड ट्रम्प यांनी शिकारीत मारल्या गेलेल्या हत्तींचे काही अवयव अमेरिकेत आयात करण्यास परवानगी दिली आहे. वास्तविक ओबामा सरकारने या निर्णयावर बंदी आणली होती. मात्र ट्रम्प सरकारने ती बंदी उठविली आहे. ट्रम्प सरकारच्या या निर्णयामुळे वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, ट्रम्प प्रशासनाचा त्यांच्याकडून निषेध केला जात आहे.
याच निर्णयामुळे सोनम कपूरने ट्रम्प यांना मूर्ख म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांच्या निर्णयाचा निषेधही केला आहे. सोनम कपूरने ट्विट करताना लिहिले की, ‘भारतात शिकार करणे बेकायदेशीर असून, संपूर्ण जग भारताकडून याबाबतची शिकवण घेते. परंतु ट्रम्प मूर्ख आहेत.’ सोनमने हे ट्विट एका ट्विटला उत्तर देताना केले आहे. सोनमने हे ट्विट करताना अमेरिकी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना टॅगही केले आहे.
दरम्यान, अमेरिकेतील शिकारशी संबंधित काही संघटनांनी म्हटले की, राष्ट्रपतींच्या या निर्णयामुळे हत्तींच्या संरक्षणासाठी मदत मिळेल. अमेरिकेच्या नॅशनल रायफल असोसिएशन आणि सफारी क्लब इंटरनॅशनल फाउंडेशनने म्हटले की, आफ्रिकी देशांमध्ये ते लोक शिकार करण्यासाठी राज्य सरकारला मोठी रक्कम देतात. तेथील राज्य सरकार या पैशांचा वापर हत्तींच्या संरक्षणासाठी करते. या संस्थांच्या मते, पुरेसा निधी नसल्यामुळे या देशांमध्ये हत्तींची योग्य देखभाल करता येत नाही. असो, अमेरिकेतील संस्था जरी ट्रम्प यांच्या निर्णयाचे स्वागत करीत असले तरी, जगभरातील विविध प्राणीप्रेमींकडून मात्र याचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे.

}}}} ">Hunting is illegal in india, one of things the world can learn from us! Trump is an imbecile ! @potus#proudtobeindian#preserveourworldpic.twitter.com/retBm6Y1MZ— Sonam Kapoor (@sonamakapoor) March 9, 2018
Hunting is illegal in india, one of things the world can learn from us! Trump is an imbecile ! @potus#proudtobeindian#preserveourworldpic.twitter.com/retBm6Y1MZ— Sonam Kapoor (@sonamakapoor) March 9, 2018