हे भगवान मैं क्या करू? सोनम कपूरला सतावतोय एकच प्रश्न, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 16:51 IST2020-05-13T16:51:01+5:302020-05-13T16:51:31+5:30
अनेकदा सोनम तयार होते. पण मग तयार होऊन करायचे काय? असा प्रश्न तिला पडतो.

हे भगवान मैं क्या करू? सोनम कपूरला सतावतोय एकच प्रश्न, पण का?
सोनम कपूर सध्या जाम चर्चेत आहे़ होय, कालपरवाच सोनमने आपल्या घराचे इनसाईड फोटो शेअर केलेत. बेडरूमपासून तर किचनपर्यंतचे अनेक फोटो तिने पोस्ट केलेत. आता तिचे आणखी काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोला सोनमने दिलेले कॅन्शन लक्षवेधी आहे. होय, मुळात लॉकडाऊनमुळे सोनम वैतागली आहे. घरी राहून राहून जाम कंटाळलीय. इतकी की, काय करू नि काय नको, अशी तिच्या मनाची अवस्था आहे. अनेकदा सोनम तयार होते. पण मग तयार होऊन करायचे काय? असा प्रश्न तिला पडतो.
सोनमने सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत कॅप्शनही आहे. एका फोटोवर ‘देवा मी आता काय करू?’असे कॅप्शन तिने दिले आहे. ही सगळीच कॅप्शन मजेशीर आहेत.
सोनम कपूर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह राहणारी अभिनेत्री आहे. बाहेरच्या जगातही ती तेवढीच ‘सोशल’ आहे. सोनम आणि तिचा पती आनंद गत 19 मार्चला लंडनवरून भारतात परतले होते. तेव्हापासून दोघेही दिल्लीतील आपल्या घरी आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून घरात कैद असल्याने काही दिवसांपूर्वी आनंद काहीसा इमोशनल झाला होता. पण त्यावेळी सोनमने त्याला धीर दिला होता.
कोरोनाचा धोका असतानाही सोनम व आनंदने भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता. तसे ते परतलेही. अलीकडे अनुपमा चोप्रा हिला दिलेल्या मुलाखतीत सोनम यावर बोलली होती. इतकी मोठी जोखिम पत्करून तुम्ही भारतात येण्याचा निर्णय का घेतला? असा प्रश्न सोनमला विचारला गेला होता.
यावर उत्तर देताना सोनमने सांगितले होते की, भारतात लॉकडाऊनची घोषणा होण्याआधीच आम्ही परतण्याचा निर्णय घेतला होता. कारण माझे वडिल (अनिल कपूर) 63 वर्षांचे आहेत. माझी आई सुद्धा त्याच वयाची आहे. आम्ही सध्या आनंदच्या आजीकडे राहतोय. ती 80 च्या घरात आहेत. अशास्थितीत या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही परतलो. अगदी जोखीम असतानाही आम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर अलीकडे ‘जोया फॅक्टर’ या सिनेमात सोनम दिसली होती. यानंतर ती सुजॉय घोष यांच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘ब्लाइंड’ असल्याचे कळतेय.