भावी पतीसोबत सोनम कपूरने मेहंदी सेरेमनीत असे लावले ठुमके!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 06:30 AM2018-05-07T06:30:32+5:302018-05-07T12:02:12+5:30

रविवारी संध्याकाळी सोनमच्या हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. सोनमच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. ...

Sonam Kapoor shared with Mehdi Ceremonies with a future husband. | भावी पतीसोबत सोनम कपूरने मेहंदी सेरेमनीत असे लावले ठुमके!

भावी पतीसोबत सोनम कपूरने मेहंदी सेरेमनीत असे लावले ठुमके!

googlenewsNext
िवारी संध्याकाळी सोनमच्या हळदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. सोनमच्या लग्नाची तयारी सध्या जोरात सुरु आहे. बॉलिवूडची ब्राईड-टू-बी चा व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ती मेहंदी सेरेमनीमध्ये ठुमके लावताना दिसते आहे. ऐवढचे नाही तर सोनम कपूर आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत 'लत लग गई'या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. सोनम आनंदच्या मिठीत डान्स करताना दिसते आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत सोनम खूप मस्ती करताना दिसते आहे.

आज सोनमची संगीत सेरेमनी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूर, रेहा कपूर, अंशुला कपूर सोनमच्या संगीत सेरेमनीत डान्स परफॉर्म करण्यासाठी तयारीला लागले आहेत. तर अनिल कपूर लाडक्या लेकीच्या संगीत सेरेमनीमध्ये वन टु का फोर या गाण्यावर स्पेशल डान्स नंबर सादर करणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच कपूर आणि अहुजा कुटुंबीयांनी एकत्र येऊन 8 मे रोजी सोनम आणि आनंद लग्नाच्या पवित्र गाठित अडकणार असल्याचे अधिकृतरित्या जाहिर केले होते. सोनमची वेडिंग सेरेमनीआण्टी आणि इंटीरियर डिझायनर कविता सिंग यांच्या बॅण्डस्टॅण्डस्थित आलिशान बंगल्यात पार पडणार आहे. लग्नाचे सर्व विधी घरातच असलेल्या मंदिरात केले जाणार आहेत. त्यानंतर दिल्लीत देखील जंगी रिसेप्शन होणार आहे. आनंद अहुजा हा दिल्लीचा असल्यामुळे मुंबईनंतर दिल्लीतदेखील सेलिब्रेशन होणार आहे. 

आनंद आणि सोनमच्या अफेअरची चर्चा 2016पासून आहे. मात्र सोनम आणि आनंदने कधीही त्यांच्यातील रिलेशनशिपविषयी जाहिरपणे सांगितले नाही. दोघीनीही नाते प्रायव्हेट ठेवले होते. मात्र त्यांच्यातल्या केमिस्ट्रीमुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. आनंद देशातील सर्वात मोठ्या एक्सपोर्ट हाउस म्हणजे शाही एक्सपोर्टचे मालक हरिष आहुजाचा यांचा मुलगा आहे. आनंद या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. हा त्याचा फॅमिली बिझनेस आहे.