सोनम कपूर पुन्हा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले भारताची नवी ‘राखी सावंत’!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 02:20 PM2019-08-19T14:20:13+5:302019-08-19T14:20:32+5:30

कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरच्या प्रतिक्रिया अद्यापही थांबलेल्या नाहीत. ताजी प्रतिक्रिया आहे, ती अभिनेत्री सोनम कपूरची.

sonam kapoor shares views on kashmir situation trolls again | सोनम कपूर पुन्हा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले भारताची नवी ‘राखी सावंत’!

सोनम कपूर पुन्हा झाली ट्रोल; युजर्स म्हणाले भारताची नवी ‘राखी सावंत’!

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक युजर्सनी सोनम कपूरला ब्लॉक करायला हवे, असे मत मांडले.

कलम ३७० रद्द करून जम्मू काश्मीर राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरच्या प्रतिक्रिया अद्यापही थांबलेल्या नाहीत. ताजी प्रतिक्रिया आहे, ती अभिनेत्री सोनम कपूरची. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सोनम या मुद्यावर बोलली आणि बोलताच ट्रोल झाली.
होय, सध्याची परिस्थिती मन हेलावून टाकणारी आहे. परंतु मी खूप मोठी देशभक्त आहे. माझे म्हणाल तर सध्या माझ्यासाठी शांत राहणेच योग्य आहे. कारण माझ्या मते, हा काळ सुद्धा निघून जाईल. आपला देश ७० वर्षांपूर्वी एकसंध होता आणि आताचे विभाजनाचे राजकारण पाहून मन हेलावणारे आहे, असे सोनम यावेळी म्हणाली.




  काश्मीर मुद्द्यावर सोनमचे मत विचारल्यावर तिने यावर थेटपणे बोलणे टाळले. ‘हे प्रकरण फार गुंतागुंतीचे आहे. कारण सगळीकडे वेगवेगळ्या बातम्या येत आहेत, त्यामुळे सत्य काय हेच मला कळत नाही. पूर्ण माहिती असेल तेव्हाच मी अधिकारवाणीने बोलू शकेल. पण मी एक कलाकार आहे आणि या नात्याने माझे काम सर्वत्र दिसावे, हीच माझी इच्छा आहे. ‘नीरजा’ पाकिस्तानात दाखवला गेला नाही. ही गोष्ट मला प्रचंड दुखावणारी होती. कारण माझी पाकिस्तानात खूप मोठी फॅन फॉलोर्इंग आहे. सिंधी असल्यासोबतच मी पेशावरीसुद्धा आहे, असेही सोनम म्हणाली. 







अर्थात तिचे स्वत:ला पेशावरी म्हणणे चाहत्यांना रूचले नाहीत. त्यांनी लगेच तिला ट्रोल करणे सुरु केले.  भारताची नवी ‘राखी सावंत’, असे एका युजरने लिहिले. अनेक युजर्सनी सोनम कपूरला ब्लॉक करायला हवे, असे मत मांडले.

Web Title: sonam kapoor shares views on kashmir situation trolls again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.