पहिल्या मासिक पाळीविषयी बोलली सोनम कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 12:04 PM2018-01-14T12:04:55+5:302018-01-14T17:34:55+5:30

अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती या चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार आणि राधिका ...

Sonam Kapoor talked about the first menstrual cycle! | पहिल्या मासिक पाळीविषयी बोलली सोनम कपूर!

पहिल्या मासिक पाळीविषयी बोलली सोनम कपूर!

googlenewsNext
िनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ती या चित्रपटात अभिनेता अक्षयकुमार आणि राधिका आपटे यांच्यासोबत बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट मुरुगनाथम यांच्या जीवनावर आधारित आहे. ज्यांनी ग्रामीण दुर्गम भागातील महिलांसाठी स्वस्त सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून दिले. सोनमचा हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. दरम्यान, सोनमने नुकतेच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये तिच्या मासिक पाळीविषयी वक्तव्य केले. पहिल्यांदा जेव्हा तिला मासिक पाळी आली होती, तेव्हा तिच्यासोबत काय घडले याविषयी तिने सांगितले. 

या प्रमोशन इव्हेंटमध्ये सोनमला तिच्या पहिल्या मासिक पाळीविषयी विचारण्यात आले. त्यावर बोलताना सोनम कपूरने म्हटले की, जेव्हा मी १५ वर्षांची होती, तेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. वास्तविक माझ्या मैत्रिणींना अगोदरच मासिक पाळी येऊन गेली होती. त्यामुळे, मला का मासिक पाळी आली नाही? या विचाराने मी दु:खी झाली होती. मात्र जेव्हा मासिक पाळी आली तेव्हा मी स्वत:ला स्वस्थ व्यक्त केले. कारण मासिक पाळी येत नसल्याने मी सातत्याने माझ्या मम्मीला याविषयी विचारत असे. त्याचबरोबर मला कसली तरी व्याधी असावी, असेही मी तिला सतत बोलत असे. परंतु जेव्हा पाळी आली तेव्हा मी एकप्रकारे आनंदी झाली होती.  



यावेळी सोनमने हेदेखील म्हटले की, मासिक पाळीत बºयाचदा मुली असा विचार करतात की, अधिकाधिक झोप काढल्याने आराम मिळतो. मात्र मला असे वाटते की, यादरम्यान तुम्ही जेवढे फिजिकल वर्क कराल तेवढे तुम्हाला बरे वाटेल. यावेळी सोनमने महिलांसाठी पीरियड्स असताना काय करावे यावर काही टीप्सही दिल्या. तिने म्हटले की, मासिक पाळीदरम्यान अधिकाधिक पाणी प्यायला हवे. यामुळे थकवा जाणवत नाही. यावेळी सोनमने देशातील केवळ १२ टक्के महिलाच सॅनिटरी पॅडचा वापर करीत असल्याचे सांगितले. 

Web Title: Sonam Kapoor talked about the first menstrual cycle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.