सोनम कपूरला करायचे आहे अशा सिनेमात काम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 12:39 PM2018-09-03T12:39:04+5:302018-09-03T12:44:22+5:30
सोनम कपूरने यावर्षी 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' व 'संजू' चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सर्वत्र खूप कौतूक झाले.
बॉलिवूडची फॅशन आयकॉन म्हणजेच अभिनेत्री सोनम कपूरने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ती नेहमी वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यावर्षी तिने 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' व 'संजू' चित्रपटात काम केले. या सिनेमातील तिच्या कामाचे सर्वत्र खूप कौतूक झाले. आता सोनम म्हणते की तिला अशा चित्रपटांचा हिस्सा बनायचे आहे जे फक्त लोकांचे मनोरंजन करणार नाही तर समाजाला प्रभावित करेल.
सोनम म्हणाली की, 'मी अशा कथेच्या शोधात आहे जी माझी भूमिका समाजाला प्रभावित करेल आणि लोकांचे मनोरंजनदेखील करेल. मला अशा चित्रपटाचा हिस्सा बनायचा आहे जे मनोरंजनासोबतच समाजाला सामाजिक संदेश देईल. '
सोनमला २०१८ वर्ष चांगले असून ती सांगते की, ''रांझना'च्या प्रदर्शनापासून सगळे चांगले होते आहे. काही दिग्दर्शकांना तिच्यावर विश्वास अाहे. तिला बॉलिवूडमध्ये पदार्पण करून सहा वर्षे झाले. तिचा एकही सिनेमा फ्लॉप ठरला नाही.'
सोनमने अनुजा चौहान यांच्या कादंबरीवर आधारीत 'द झोया फॅक्टर' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. या चित्रपटाबाबत सोनम म्हणाली की, 'प्रत्येकाला वाटते आहे की मी झोयाची भूमिका करावी, हे खूप मजेशीर होते. मला हलकीफुलकी भूमिका करायची आहे. मात्र इतरांना वाटत आहे की ड्रामा असणारा रोल करावा. खुबसूरतनंतर मी हलकाफुलक्या सिनेमात काम करते आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. मी दलकीर सलमानसोबत चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. '
विधु विनोद चोप्राचा आगामी सिनेमा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'मध्ये सोनम पहिल्यांदाच तिचे वडील अनिल कपूर यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. कुटुंबासोबत काम करणे नेहमीच खूप मजेशीर असल्याचे सोनम म्हणाली.