सोनम कपूर निखिल आडवाणीच्या आगामी चित्रपटात साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 07:17 PM2018-11-24T19:17:11+5:302018-11-24T19:19:43+5:30

सोनम कपूर, निखिल आडवाणीच्या आगामी चित्रपटात सोनम काम करणार असून तिला या चित्रपटासाठी विचारण्यात आले आहे.

Sonam Kapoor will play the part in Nikhil Advani's forthcoming film | सोनम कपूर निखिल आडवाणीच्या आगामी चित्रपटात साकारणार ही भूमिका

सोनम कपूर निखिल आडवाणीच्या आगामी चित्रपटात साकारणार ही भूमिका

ठळक मुद्देसोनम कपूर दिसणार 'द झोया फॅक्टर' चित्रपटातनिखिल आडवाणीचा चित्रपटाच्या चित्रीकरणाला  सोनम कपूर लवकरच करणार सुरूवात

अभिनेत्री सोनम कपूर नेहमी तिच्या स्टाईल स्टेटमेंट व नवरा आनंद आहुजासोबतच्या सोशल पोस्टमुळे चर्चेत असते. मात्र आता सोनम कपूरने नवीन सिनेमा साईन केल्याचे समजते आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोनम कपूर, निखिल आडवाणीच्या आगामी चित्रपटात सोनम काम करणार असून तिला या चित्रपटासाठी विचारण्यात आले आहे. हा थरारपट असून यात सोनम पोलिसाच्या भूमिका दिसणार असल्याचे समजते आहे. 
 
सूत्रांच्या माहितीनुसार, निखिल आडवाणीचा चित्रपटासाठी सोनम कपूर लवकरच चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. हा चित्रपट एका पुस्तकावर आधारीत आहे. सध्या चित्रपट निर्माते या चित्रपटातील मुख्य नायकाच्या शोधात आहेत. 
सोनम कपूर अनुजा चौहान यांच्या कादंबरीवर आधारीत 'द झोया फॅक्टर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाबाबत सोनम म्हणाली की, 'प्रत्येकाला वाटते आहे की मी झोयाची भूमिका करावी, हे खूप मजेशीर होते. मला हलकीफुलकी भूमिका करायची आहे. मात्र इतरांना वाटत आहे की ड्रामा असणारा रोल करावा. खुबसूरतनंतर मी हलकाफुलक्या सिनेमात काम करते आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करत आहेत. ते खूप चांगले व्यक्ती आहेत. माझ्यासोबत दलकीर सलमान प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.' विधु विनोद चोप्राचा आगामी सिनेमा 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'मध्ये सोनम पहिल्यांदाच तिचे वडील अनिल कपूर यांच्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. कुटुंबासोबत काम करणे नेहमीच खूप मजेशीर असल्याचे सोनम म्हणाली.

Web Title: Sonam Kapoor will play the part in Nikhil Advani's forthcoming film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.