Song Out : फरहान अख्तरच्या ‘लखनऊ सेंट्रल’मधील ‘कावां कावां’ गाण्याची इंटरनेटवर धूम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 03:42 PM2017-08-03T15:42:53+5:302017-08-03T21:12:53+5:30

जुन्या गाण्याचे नवे व्हर्जन हा फॉर्म्युला पुन्हा एकदा हिट होेताना दिसत आहे. हे गाणे मीरा नायर यांच्या २००१ मध्ये आलेल्या ‘मॉनसून वेडिंग’ या चित्रपटातील नवे व्हर्जन आहे.

Song Out: Farhan Akhtar's 'Kawan Kavan' song in Lucknow Central! | Song Out : फरहान अख्तरच्या ‘लखनऊ सेंट्रल’मधील ‘कावां कावां’ गाण्याची इंटरनेटवर धूम!

Song Out : फरहान अख्तरच्या ‘लखनऊ सेंट्रल’मधील ‘कावां कावां’ गाण्याची इंटरनेटवर धूम!

googlenewsNext
िनेता फरहान अख्तर याच्या आगामी ‘लखनऊ सेंट्रल’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला. ट्रेलरला चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. आता याच चित्रपटातील एक गाणे रिलीज करण्यात आले असून, या गाण्याने इंटरनेटवर धूम उडवून दिली आहे. ‘कावां कावां’ हे गाणे सध्या अनेकांच्या ओठावर असून, जुन्या गाण्याचे नवे व्हर्जन हा फॉर्म्युला पुन्हा एकदा हिट होेताना दिसत आहे. हे गाणे मीरा नायर यांच्या २००१ मध्ये आलेल्या ‘मॉनसून वेडिंग’ या चित्रपटातील नवे व्हर्जन आहे. ‘लखनऊ सेंट्रल’मधील हे गाणे दिव्यकुमार यांनी गायिले आहे. 

व्हिडीओमध्ये गाण्याबरोबरच अभिनेत्यांचे काही डायलॉगही आहेत. त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, या सर्व कैद्यांना कारागृहातून पळून जायचे असते. कारागृहातून पळून जाण्यासाठी हे सर्व कैदी बॅण्ड पार्टीचा आधार घेत असतात. आता हे कैदी कारागृहातून पळून जाण्यात यशस्वी होतील काय? फरहानचे बॅण्ड पार्टीचे स्वप्न किती काळ टिकून राहील? यासर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपटाला बघितल्यानंतरच मिळतील. 



वास्तविक हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे. चित्रपटात फरहानला भोजपुरी गायक बनायचे असते. स्वत:ची बॅण्ड पार्टी बनविण्यासाठी त्याची धडपड सुरू असते. मात्र एका खुनाच्या गुन्ह्यात तो विनाकारण गोवला जातो. पुढे त्याला शिक्षा ठोठावली जाते. त्यानंतर त्याची ‘लखनऊ सेंट्रल’ कारागृहात रवानगी केली जाते. मात्र अशातही तो त्याच्या बॅण्ड पार्टीचे स्वप्न पूर्ण करतो. कारागृहात तो बॅण्ड पार्टी तयार करतो. यासाठी काही कैदी त्याच्याबरोबर येतात. मात्र त्याचबरोबर ते सर्व कारागृहात पळ काढण्याचाही प्लॅन करतात. 

चित्रपटात फरहान व्यतिरिक्त डायना पेंटी, दीपक डोबरियाल, रोनित रॉय, पंजाबी स्टार गिप्पी ग्रेवाल, राजेश शर्मा आणि रवि किशन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रंजीत तिवारी आणि निखिल आडवानी यांनी केले आहे. एका भोजपुरी गायकाची भूमिका साकारण्यासाठी फरहानने प्रचंड मेहनत घेतली आहे. वृत्तानुसार ही भूमिका परफेक्ट करण्यासाठी फरहानने भोजपुरी स्टार मनोज तिवारी आणि रवि किशन यांचे तब्बल २० चित्रपट बघितले आहेत. हा चित्रपट १५ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. 

Web Title: Song Out: Farhan Akhtar's 'Kawan Kavan' song in Lucknow Central!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.