song Socha Hai​ out : पाहा, ‘बादशाहो’चे ‘बिना रॅप वाला रिमिक्स’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 07:30 AM2017-08-17T07:30:35+5:302017-08-17T13:00:35+5:30

अजय देवगणच्या ‘बादशाहो’ या चित्रपटाचे नवे गाणे ‘सोचा है’ आज रिलीज झाले. हे गाणे इतके सहज-सुंदर आहे की, तुम्हाला ते नक्की आवडणार.

song Socha Hai out: Look, 'Badshaho's' un-raped remix' | song Socha Hai​ out : पाहा, ‘बादशाहो’चे ‘बिना रॅप वाला रिमिक्स’

song Socha Hai​ out : पाहा, ‘बादशाहो’चे ‘बिना रॅप वाला रिमिक्स’

googlenewsNext
य देवगणच्या ‘बादशाहो’ या चित्रपटाचे नवे गाणे ‘सोचा है’ आज रिलीज झाले. हे गाणे इतके सहज-सुंदर आहे की, तुम्हाला ते नक्की आवडणार. ‘कह दूं तुम्हे या चूप रहूं’ हे ‘दीवार’मधील अतिशय लोकप्रीय गाणे आणि त्याचे संगीत असे सगळे मिळून हे नवे गाणे तयार करण्यात आले आहे. 



या गाण्यातील आणखी एक जमेची बाजू म्हणजे, यातील इमरान हाश्मी आणि इशा गुप्ता यांची जबरदस्त केमिस्ट्री. इमरान व इशा दोघेही बाईकवर रोमान्स करताना यात दिसत आहेत. गाण्यातील एका सीन्समध्ये इमरान व इशा शशी कपूरची सिग्नेचर स्टेप करताना दिसताहेत. गाण्याला रॅप न करताना रिमिक्स बनवण्यात आले आहे. यापूर्वी अनेक रिमिक्स गाणी आली आहेत. पण हे गाणे त्यासर्वांपेक्षा वेगळे आहे, असे म्हणायला हरकत नाही. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता.  या ट्रेलरमध्ये दमदार अ‍ॅक्शन, तेवढेच दमदार डायलॉग्स असे सगळे दिसले होते. हे गाणे बघता, या चित्रपटात रोमान्सचीही कमी नाही, हेच दिसते. 
‘बादशाहो’ची कथा १९७५ च्या आणीबाणी पार्श्वभूमीवर रेखाटली गेली आहे. याकाळात भारतातील सोने एका गावातून दुस-या गावात नेले जात असताना काही लोक हे सोने लुटण्याचा कट रचतात, अशी ही कथा आहे.  एका मुलाखतीदरम्यान मिलन लुथरिया यांना ‘बादशाहो’च्या चित्रपटाची कथा कशी सुचली, यामागेही एक सुरस कथा आहे. १९९९ मध्ये राजस्थानात ‘कच्चे धागे’चे शूटींग सुुरू असताना मिलन यांना ही कथा  क्लिक झाली होती. या चित्रपटातही अजय देवगण लीड रोलमध्ये होता. म्हणजेच २० वर्षांपूर्वी  क्लिक  झालेली कथा ‘बादशाहो’च्या निमित्ताने आपल्याला पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Web Title: song Socha Hai out: Look, 'Badshaho's' un-raped remix'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.