Sonu Nigam : 'अजान'नंतर नवरात्रीतील मटण बंदीबाबत सोनू निगम बोलला; सोशल मीडियावर वादाचा विषय ठरला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 11:20 AM2022-05-20T11:20:54+5:302022-05-20T11:21:42+5:30
Sonu Nigam : बॉलिवूड अभिनेता सोनू निगम वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
बॉलिवूड अभिनेता सोनू निगम (Sonu Nigam ) वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतो. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडीओत सोनू निगम नवरात्रीत मटण बंदीवर बोलताना दिसतोय. ‘नवरात्रीत मटण बंदी कशाला?’, असा सवाल त्यानं केला आहे. त्याच्या हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर सोनूला जबरदस्त ट्रोल केलं जातंय.
The way you present something is more important than what you're presenting!!one must use refined language on such platforms...there could have been a subtle way to say this.
— vinitaskasana✨ (@itagotnochill) May 18, 2022
If chanting JAI SHREE RAM makes one a "BHAKT" I think I'm a part of that throng. #BhandSonuNigampic.twitter.com/yv2DNlxHzR
काय बोलला सोनू निगम?
सोनू निगमने काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीची एक क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. ‘नवरात्रीदरम्यान मटण बंदी कशासाठी? नवरात्रीदरम्यान मटणाची दुकानं बंद करणं, चुकीचं आहे. काही लोक मटण विकून पोट भरतात. हे त्यांचं काम आहे. त्यावर त्यांचं पोट अवलंबून आहे. त्यांची दुकानं तुम्ही बंद करू शकत नाही,’ असं सोनू व्हिडीओत म्हणतोय. जय श्रीराम म्हणण्यावरही तो बोलला आहे. ‘ मी काही भक्त नाही की, तुम्ही म्हणता म्हणून मी जय श्रीराम म्हणेल’, असंही तो व्हिडीओत म्हणतोय. त्याच्या मुलाखतीचा हाच भाग व्हायरल होतोय आणि लोकांनी त्याला ट्रोल करणं सुरू केलंय.
Simple tricks to become cool and come in attention: 👇
— Sarthak Bhawankar 🇮🇳 (@sarthakvb_108) May 18, 2022
• Oppose the ruling government
• Call Hindus Fac!st
• Call BJP Supporters Bhakt,
Andhbhakt
• Keep relations with Underworld#BhandSonuNigampic.twitter.com/vrfwsWqtbA
सोनू निगम ट्रोल
याआधी 2017 मध्ये सोनूने मशिदीवरील भोंग्यावरच्या अजानचा विरोध केला होता. अजानवरच्या त्याच्या ट्विटवरून वादळ उठलं होतं. वाद भोवण्याची चिन्ह दिसताच सोनूने एक पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं होतं. ‘मी कोणत्याही धर्माचा विरोध केलेला नाही. मी धर्मनिरपेक्ष आहे. अजान संदर्भातीलच नाही तर भोंग्याच्या माध्यमातून होणाऱ्या आवाजाच्या तीव्रतेसंदर्भात मी बोललो होतो,’असा खुलासा त्याने केला होता. आता या मुलाखतीवरूनही सोनू ट्रोल होतोय. ट्विटवर सोनू निगमवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत आहे. कोणी त्याला नवरात्रीत मटण बंदी नको, यावरून धारेवर धरलं आहे तर काहींनी श्रीराम संदर्भातील वक्तव्यावरून त्याला फैलावर घेतलं आहे. अर्थात सोनूच्या चाहत्यांनी मात्र त्याचा बचाव केला आहे.