राफिया नाजविरोधात काढलेल्या फतव्यावर सोनू निगमने म्हटले, ‘हा फतवा नसून सुपारी दिली आहे’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 03:39 PM2017-11-11T15:39:35+5:302017-11-11T21:09:35+5:30

गायक सोनू निगम सध्या त्याच्या गाण्यांपेक्षा त्याच्या वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत आहे. आता सोनू निगमने रांचीच्या राफिया नाज यांच्याविरोधात फतवा ...

Sonu Nigam said on the fatwa drawn against Rafia Naz, 'It is not a fatwa but a beetle'! | राफिया नाजविरोधात काढलेल्या फतव्यावर सोनू निगमने म्हटले, ‘हा फतवा नसून सुपारी दिली आहे’!

राफिया नाजविरोधात काढलेल्या फतव्यावर सोनू निगमने म्हटले, ‘हा फतवा नसून सुपारी दिली आहे’!

googlenewsNext
यक सोनू निगम सध्या त्याच्या गाण्यांपेक्षा त्याच्या वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत आहे. आता सोनू निगमने रांचीच्या राफिया नाज यांच्याविरोधात फतवा काढणाºयांविरुद्ध एक व्हिडीओ रिलीज केला आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनाही योगात चकित करणाºया अध्यापिका राफिया नाज यांनी योगाचे धडे देऊ नये म्हणून काही कट्टरपंथियांनी त्यांच्याविरोधात एक फतवा काढला आहे. या फतव्यानुसार योग शिकविणे बंद कर अन्यथा तुला जिवे मारणार, अशी धमकी त्यात दिली आहे. राफिया मुस्लीम असूनही योगाचे धडे कसे देऊ शकते, असे म्हणत काही कट्टरपंथियांनी तिच्या घरावर दगडफेकही केली होती. आता तिच्या समर्थनार्थ सोनू निगम पुढे आला असून, अशाप्रकारच्या कट्टरपंथियांना धडा शिकवायलाच हवा, असे त्याने म्हटले आहे. 



एक व्हिडीओ रिलीज करून त्यात सोनूने म्हटले की, ‘फतवा काढणारी व्यक्ती सुपारी देण्याचे काम करीत आहे. योगाचा धर्माशी संबंध जोडायला नको,’ असे सोनूने म्हटले आहे. सोनूच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा तो वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे. सोनूच्या मते, राफिया नाजविरोधात काढलेल्या फतव्यावर बॅन लावायला हवे. त्याचबरोबर फतवा काढणाºयाला कठोर शिक्षा द्यायला हवी. फतवा देणारी व्यक्ती सुपारी देण्याचे काम करीत आहे. या लोकांनी कायदा आपल्या हातात घ्यायला नको, असेही सोनूने म्हटले. यावेळी सोनू निगमने हेदेखील म्हटले की, ज्यांनी त्यांना आणि त्यांच्या बहिणीला योगा शिकविला ते मुस्लीम आहेत. त्यांच्या वडिलांना ज्यांनी योगा शिकविला तेदेखील मुस्लीम आहेत. प्रत्येक व्यक्तीला सुदृढ आरोग्यासाठी आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी हे आवश्यक आहे. 



तर या फतव्यावर राफियाने सांगितले की, ‘मी अशाप्रकारच्या फतव्यांना घाबरणार नसून, मी माझे काम करीत राहणार आहे. दरम्यान, कट्टरपंथियांकडून फतवा जारी होताच राज्य सरकारने राफियाला संरक्षण दिले आहे. राफियाने याबाबतची रीतसर तक्रार पोलिसांत केली असून, पोलिसांनीदेखील या सर्व प्रकाराकडे अतिशय गांभीर्याने बघितले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या मते, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून, काही संशयितांची विचारपूस केली जात आहे. राफियाच्या संरक्षणाची जबाबदारी पोलीस उपअधीक्षक विकास पांडे यांच्यावर आहे. 

Web Title: Sonu Nigam said on the fatwa drawn against Rafia Naz, 'It is not a fatwa but a beetle'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.