लॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे इतक्या कोटींचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 06:45 PM2020-05-27T18:45:39+5:302020-05-27T18:46:11+5:30

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे.  

sonu sood became god for worker,He owns property worth so many crores TJL | लॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे इतक्या कोटींचा मालक

लॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे इतक्या कोटींचा मालक

googlenewsNext

अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनूच्या या कामाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर सोनू ट्रेंड करतोय. सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो नायक बनला आहे.

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना एका ट्विटवर किंवा मेसेजवर त्यांच्या घरी सोडत आहे. त्यामुळे सोनू सूदचे सगळीकडे खूप कौतूक होत आहे. आज सोनू सूदच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. मीडिया रिपोर्टनुसार, सोनू सूदने 1999 साली आपल्या करिअरला सुरुवात केली होती.


सोनू फक्त चित्रपटांमधूनच नाही तर जाहिरातींमधूनही खूप कमाई करतो. सोनूच्या सध्याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर एका इंग्रजी वृत्तानुसार, सोनू एकूण 130.339 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. सोनू मुंबईच्या अंधेरी वेस्टमधील लोखंडवालाच्या यमुना नगरमध्ये राहतो आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जवळपास सर्वच सेलेब्रिटी घरी थांबले आहेत. इतर सेलेब्रिटी घरातच आराम करत असताना सोनू मात्र रस्त्यावर उतरून मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येक जण सोनूकडे घरी जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, त्यांच्या अडचणी सांगत आहेत. या सगळ्यांना सोनू आवर्जून मदतीचा हात देत आहे.

मजुरांसाठी बसेसची व्यवस्था करण्यापासून ते प्रवास करत असलेल्या राज्य सरकारांच्या परवानग्या मिळवण्यापर्यंतचे सर्व सोपस्कार सोनू पार पाडत आहे. त्यामुळे सगळ्यांकडून सोनूवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Web Title: sonu sood became god for worker,He owns property worth so many crores TJL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.