क्या बात! सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात, लोकांकडून कौतुक....

By अमित इंगोले | Published: October 5, 2020 09:29 AM2020-10-05T09:29:19+5:302020-10-05T09:30:06+5:30

सोनूने लॉकडाऊन दरम्यान हजारो प्रवासी मजूरांना घरी पोहोचवलं. आता तो अशा व्यक्तीसाठी देवदूत ठरत आहे ज्याला योग्य उपचार मिळत नव्हता. 

Sonu Sood helps auto driver who lost his hand in accident | क्या बात! सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात, लोकांकडून कौतुक....

क्या बात! सोनू सूद रिक्षा ड्रायव्हरला मिळवून देणार नवा हात, लोकांकडून कौतुक....

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनपासून अजूनही लोकांची मदत करत आहे. गरजू लोकांच्या एका हाकेवर सोनू त्यांची मदत करण्यासाठी समोर येतो. सोनूने लॉकडाऊन दरम्यान हजारो प्रवासी मजूरांना घरी पोहोचवलं. आता तो अशा व्यक्तीसाठी देवदूत ठरत आहे ज्याला योग्य उपचार मिळत नव्हता. 

कुणाल सिंह राजपूत नावाच्या एका  ट्विटर यूजरने सोनू सूद आणि नीति गोयल यांना टॅग करून एक ट्विट केलं. त्याने लिहिले की, 'माझ्या शेजाऱ्याचा एका अपघातात हात जखमी झालाय. सहा महिन्यांच्या उपचारानंतरही तो बरा होऊ शकलेला नाही. कारण त्याच्यावर योग्य उपचार होत नाहीयेत. तो रिक्षा चालवून आपल्या परिवाराचं पोट भरतो. घरात कमावणारा तो एकटाच आहे. त्याला लहान मुलं आहेत. लवकर उपचार केले नाहीत तर त्याचा हात कापावा लागेल'. (दिलदार सुपरहिरो! ऑनलाईन शिक्षणासाठी सोनू सूदचा पुढाकार, गावात बसवला थेट मोबाईल टॉवर)
 

या ट्विटला उत्तर देत सोनूने लिहिले की, 'हात असा कसा कापू देऊ भाऊ? तुमची सर्जरी १२ ऑक्टोबरला फिक्स आहे. तुमच्या रिक्षात कधीतरी फिरवाल'. सोनू सूदच्या या मदतीनंतर या व्यक्तीवर योग्य ते उपचार होतील आणि तो पुन्हा रिक्षा चालवून आपल्या परिवाराचं पोट भरू शकेल. सोनूच्या या कामाचं सोशल मीडियातून भरभरून कौतुक केलं जात आहे.

दरम्यान, सोनू सूदला नुकतंच मानाच्या एनडीजी स्पेशल ह्युमनटेरिअन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यूनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम द्वारे मिळालेला हा सन्मान मिळाल्यावर सोनू सूद डेविड बेकहॅम, एंजेलिना ज्योली, लिओनार्डो डीकॅप्रियो, प्रियांका चोप्रा यांसारख्या सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये सामिल झालाय. 'सुपरहिरो' सोनू सूदने हैदराबादमध्ये शूटींगला केली सुरूवात, सेटवर लोकांचं प्रेम पाहून भारावला...
 

विद्यार्थ्यांना मदत

आताही तो कित्येकांना रोजगार मिळवून देण्यासाठी धडपडत आहे. यावेळी सोनू विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आला असून ऑनलाईन शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.  लॉकडाऊनच्या काळात सध्या सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र ऑनलाईन शिक्षण घेतान स्मार्टफोन नसणं, नेटवर्क नसणं अशा अनेक अडचणींचा सामना हा विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. मात्र सोनू सूदने आता विद्यार्थ्यांची नेटवर्कची अडचण दूर केली आहे. गावामध्ये थेट  मोबाईलचा टॉवरच उभारला आहे. पंचकुलापासून जवळपास 15 किलोमीटर असलेल्या दापना गावातील विद्यार्थ्यांना खराब नेटवर्कमुळे अभ्यास करताना काही समस्यांचा सामना करावा लागत होता. 

मोबाईल टॉवर नसल्याने मुलं झाडावर चढून करत होती अभ्यास

गावामध्ये एकही मोबाईल टॉवर नसल्याने मुलं झाडावर चढून अभ्यास करत होती. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करताना येणारी नेटवर्कची अडचण सोनू सूदने मोबाईलचा टॉवर बसवून दूर केली आहे. काही दिवसांपूर्वी सोनूने सोशल मीडियावर झाडावर चढून अभ्यास करणाऱ्या मुलांचे व्हायरल झालेले काही फोटो पाहिले होते. त्यानंतर हे फोटो नेमके कोणत्या ठिकाणचे आहेत याची माहिती करून घेतली आणि मुलांची अडचण दूर करण्याचा निर्णय घेतला. (हैदराबादमधील एक फूड स्टॉल सोनू सूदमुळे बनला स्पेशल, अभिनेत्याने दिली खास प्रतिक्रिया...)
 

विद्यार्थ्यांची अडचण दूर झाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण

सोनू सूदने आपल्या एका मित्राच्या मदतीने गावात मोबाईल टॉवरच उभारला आहे. मोबाईल टॉवरमुळे विद्यार्थ्यांची अडचण दूर झाल्याने गावामध्ये आनंदाचे वातावरण असून सोनूचं भरभरून कौतुक केलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर या दिलदार सुपरहिरोचं भरभरून कौतुक केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी सोनू सूदच्या एका चाहत्याने चक्क सिम कार्डवर त्याचं चित्र काढलं होतं. ट्विटरवर एका युजरने याबाबत एक ट्विट केलं आहे. सिम  कार्डवर सोनू सूदचा फोटो दिसत आहे. "सोनू सर, मी तुमचा फोटो सिम कार्डवर पेंट केला आहे. तुम्हाला कसा वाटला? तुम्ही खूप ग्रेट काम करत आहात" असं देखील युजरने ट्विटमध्ये म्हटलं. सिम कार्डवरील सोनू सूदचा हा फोटो जोरदार व्हायरल झाला होता. 
 

 

Web Title: Sonu Sood helps auto driver who lost his hand in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.