“सोनू सूद आमच्यासाठी देव आहे”; आता स्वत:च्या पायावर धावू शकणार लॉ कॉलेजची विद्यार्थिनी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:22 PM2020-08-13T13:22:15+5:302020-08-13T13:24:05+5:30
प्रज्ञाच्या मनात अभिनेता सोनू सूदचा विचार आला. तिने सोनूकडे ट्विटरवरुन मदतीसाठी विनंती केली तेव्हा सोनूनेही तात्काळ तिला होकार दिला.
गोरखपूर – कोरोना संकट काळात अनेकांच्या मदतीसाठी धावून जाणारा अभिनेता सोनू सूद याच्या आणखी एक कार्याचं उदाहरण समोर आलं आहे. शहरातील पादरी बाजारात राहणारी लॉ कॉलेजची विद्यार्थिनी प्रज्ञा मिश्रा आता तिच्या पायावर धावू शकणार आहे. जेव्हा आपल्या माणसांनीच नाकारलं तेव्हा माणुसकीच्या नात्याने देवदूत म्हणून सोनू सूद प्रज्ञाच्या मदतीसाठी सरसावला.
अभिनेता सोनू सूदच्या मदतीने प्रज्ञाच्या दोन्ही गुडघ्यांवर बुधवारी दिल्लीत यशस्वी ऑपरेशन झाले. त्यामुळे मुलीच्या घरात सध्या आनंदाचं वातावरण आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, कलियुगात सोनू सूद आमच्यासाठी देव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोरखपूर विद्यापीठातील कायद्याचा अभ्यास करणारी प्रज्ञा मिश्रा फेब्रुवारी महिन्यात रोड अपघाताता जखमी झाली होती. या अपघातात तिचे दोन्ही गुडघे फ्रॅक्चर झाले. यानंतर सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. शहरातील रुग्णालयात मुलीला दाखविल्यानंतर डॉक्टरांनी प्रज्ञाचं ऑपरेशन करण्यास सांगितले. यासाठी दीड लाख रुपयांची व्यवस्था करण्यास तिच्या आईवडिलांना सांगितले. यानंतर, कुटुंबाने त्यांच्या नातेवाईकांपासून राजकीय नेत्यांकडे मदतीसाठी संपर्क साधला, परंतु सर्वत्र निराशा हाती आली.
या दरम्यान, प्रज्ञाच्या मनात अभिनेता सोनू सूदचा(Sonu Sood) विचार आला. तिने सोनूकडे ट्विटरवरुन मदतीसाठी विनंती केली तेव्हा सोनूनेही तात्काळ तिला होकार दिला. दिल्लीला येऊन डॉक्टरांशी बोला असं सोनूने उत्तर दिलं. यानंतर प्रज्ञा आपल्या आईसह दिल्लीला पोहोचली. दिल्ली रेल्वे स्टेशनवर सोनू सूदची टीम आधीपासूनच हजर होती. मुलगी येताच टीम तिला खासगी रुग्णालयात घेऊन गेली. बुधवारी सायंकाळी उशिरा मुलीच्या दोन्ही गुडघ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, याची कधीच अपेक्षा केली नव्हती. सोनू सूदने दाखवलेली माणुसकी आयुष्यात आपले नातेवाईकही करत नाही. मुलगी आता ठीक आहे. मुलगीसमवेत तिची आई दिल्लीत हजर आहे असं ते म्हणाले.
सोनू सूदकडून रिप्लाय येईल ही अपेक्षा नव्हती
अभिनेता सोनू सूदबद्दल बरेच काही ऐकले होते, असे या विद्यार्थिनीने म्हटले आहे. विचार केला की एकदा प्रयत्न करुया, जेव्हा अंतःकरणाने ट्विट केले तेव्हा मला स्वत: वर विश्वास नव्हता की सोनू सूदकडून लवकरच उत्तर मिळेल. जेव्हा कुटुंबातील सदस्यांना हे सांगितले गेले, तेव्हा त्या लोकांनाही पहिल्यांदा विश्वास नव्हता. जेव्हा त्याच्या टीमने फोनवर संपर्क साधला तेव्हा कुटुंबाला वाटले की खरोखरच जगात देव आहे.
अभिनेता सोनू सूद सारखा भाऊ मिळो
या मुलीने सांगितले की, जेव्हा सोनू सूदने ट्विटरवर रिप्लाय दिला, तुला मी कधीच अपंग होऊ देणार नाही. लवकरच तू गावात धावताना दिसणार आहे, त्यामुळे प्रत्येक बहिणीला सोनू सूद सारखा भाऊ मिळायला हवा,. पैशांमुळे आपल्या माणसांनीच पाठ फिरविली होती, परंतु अशी ओळख न नसताना एका ट्विटवर इतकी मोठी मदत करणं म्हणजे साक्षात देव मदतीसाठी धावून आल्यासारखं वाटतं.