ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर पडल्यानंतर सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "खरा ऑस्कर तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 11:56 IST2024-12-20T11:55:21+5:302024-12-20T11:56:01+5:30

अभिनेता सोनू सूद (Sonu Sood)ने 'लापता लेडीज' (Laapta Ladies Movie) हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्याबद्दल आपले मत व्यक्त केले.

Sonu Sood reacts after 'Missing Ladies' exit from Oscar race, says - ''Real Oscars are...'' | ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर पडल्यानंतर सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "खरा ऑस्कर तर..."

ऑस्करच्या शर्यतीतून 'लापता लेडीज' बाहेर पडल्यानंतर सोनू सूदने दिली प्रतिक्रिया, म्हणाला - "खरा ऑस्कर तर..."

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) त्याच्या आगामी चित्रपट 'फतेह'(Fateh Movie)च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचा टीझर आला असून, त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद दिला आहे. एका पत्रकार परिषदेत अभिनेत्याने 'लापता लेडीज' (Laapta Ladies Movie) हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्याबद्दल आपले मत व्यक्त केले. लोकांचे चित्रपटांवरील प्रेम हेच खरे ऑस्कर पुरस्कार असल्याचा अभिनेता म्हणाला. त्याचवेळी आमिर खान प्रॉडक्शननेही या चित्रपटाच्या रिलीजबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे.

सोनू सूद म्हणाला, ''खरा ऑस्कर प्रेक्षक आहेत जे चित्रपटांबद्दलचे प्रेम दाखवतात. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणे महत्त्वाचे आहे, पुरस्कार फक्त शोकेसमध्ये ठेवले जातात. लापता लेडीजचे दिग्दर्शन किरण रावने केले आहे. तर निर्मिती आमिर खान आणि ज्योती देशपांडे यांनी केले आहे. या चित्रपटात प्रतिभा रांटा, नितांशी गोयल आणि स्पर्श श्रीवास्तव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रवी किशनने या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.''

आमिर खानच्या टीमने दिले स्टेटमेंट
ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर, आमिर खान प्रॉडक्शनने एक निवेदन जारी केले. त्यात लिहिले की, ''लापता लेडीजने यावर्षी अकादमी पुरस्कारांसाठी शॉर्टलिस्ट झाली नाही आणि आम्ही नक्कीच निराश झालो आहोत. तथापि, या प्रवासात आम्हाला ज्या लोकांचे प्रेम आणि पाठिंबा मिळाला त्यांचे आम्ही आभारी आहोत. आमच्या चित्रपटाचा विचार केला, त्यासाठी आमिर खान प्रॉडक्शन, जिओ स्टुडिओ आणि किंडलिंग प्रॉडक्शनने अकादमीचे सदस्य आणि एफएफआय ज्युरीचे आभार माले. जगभरातील काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांसह या प्रतिष्ठित प्रक्रियेत सामील होणे हा स्वतःसाठी एक सन्मान आहे. आम्ही जगभरातील प्रेक्षकांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी आमच्या चित्रपटासाठी प्रेम आणि समर्थन दिले आहे.''

Web Title: Sonu Sood reacts after 'Missing Ladies' exit from Oscar race, says - ''Real Oscars are...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.