अनाथांचा नाथ बनणार सोनू सूद, 'त्या' चारही मुलांना घेणार दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 03:38 PM2020-08-08T15:38:08+5:302020-08-08T15:38:36+5:30
प्रवाशी मजूरांना त्यांच्या गावात रोजगारही सोनूच मिळवून देणार आहे.सोनूच्या या सत्कार्यामुळे तो सोशल मीडियावरही सुपरहिरो ठरला आहे.
आपल्या घरापासून दूर अडकलेल्या अनेक परप्रांतीय मजुरांना सोनूने स्वतःच्या खर्चाने त्यांच्या घरी पाठवलं. या कामगारांसाठी बस, रेल्वे गाड्यांची तिकीटं तर कधीकधी विमानाची तिकीटं काढून देत सोनूने त्यांना घरी पाठवलं. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता. कामगारांना मदत करण्याव्यतिरीक्त या काळात सोनूने अनेक शेतकरी कुटुंबांनाही मदत केली.
गरजु लोकांना मदत करण्याचं त्याचं काम अजूनही सुरूच आहे. त्यातच, आता प्रवाशी मजूरांना त्यांच्या गावात रोजगारही सोनूच मिळवून देणार आहे. सोनूच्या या सत्कार्यामुळे तो सोशल मीडियावरही सुपरहिरो ठरला असून त्यात आणखी एका कामाची भर पडली आहे.आता सोनू सूद अनाथांचा नाथ बनणार आहे. पंजाबमध्ये एका कुटुंबावर दुःखाचा जणू डोंगरच कोसळला. एकाच वेळी आई आणि वडिल यांच्या निधनाने अख्खं कुटुंब कोसळले.
आई-वडिलांचे छत्र हरवल्याने त्यांच्या मुलांविषयी बातमी सोनूने वर्तमानपत्रात वाचली. ही बातमी वाचल्यानंतर सोनूने त्या चारही मुलांना आधार देण्याचा निर्णय घेतला आहे. या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्याने स्विकारली आहे. अनेक संस्थादेखील सोनूला त्याच्या कामात त्याला मदत करत आहेत. सध्या मुलांचे काउंसिलिंग केले जाणार आहे. तुर्तास सोनूने घेतलेल्या या निर्णयामुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.