Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 03:59 PM2024-10-25T15:59:41+5:302024-10-25T16:04:15+5:30
Sonu Sood : चित्रपट अभिनेता सोनू सूदने बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर भाष्य केलं आहे.
चित्रपट अभिनेता सोनू सूदनेबॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर भाष्य केलं आहे. त्याने आपला देश सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. १२०० हून अधिक अनाथ आणि अपंग मुलांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्यात आला, ज्यामध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेता सोनू सूद इंदूरला आला होता. याच वेळी त्याने त्याचं रोखठोक मत मांडलं आहे.
सोनू सूद म्हणाला, "आयुष्यात चढ-उतार येतात, जी गोष्ट खाली जाते ती वरही येते. आपला देश खूप सुरक्षित आहे. इंदूरला मी नेहमीच माझं दुसरं घर म्हणतो. इंदूरशी संबंधित अशा अनेक आठवणी आहेत. मला आनंद आहे की, आज मी अशा एका कार्यक्रमात सहभागी झालो आहे जिथे लोक चांगलं काम करत आहेत. दिवाळीचा सण साजरा करण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असू शकत नाही."
"मी स्वतःला एक सामान्य माणूस समजतो. जोपर्यंत तुम्ही सामान्य जनतेचा एक भाग आहात तोपर्यंत तुम्ही स्वतःशीच जोडलेले राहता. जेव्हा तुम्ही सामान्य लोकांपासून दूर जाऊन काहीतरी वेगळं बनण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुमचं स्वतःशीच नातं तुटतं. संपूर्ण देश माझं कुटुंब आहे, मी जे चित्रपट केले आहेत ते फक्त तुमच्यासाठी केले आहेत."
बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीबद्दल सोनू सूद म्हणाला, "आयुष्यात चढ-उतार येत असतात. आपला देश खूप सुरक्षित आहे. चित्रपट हे जनजागृतीचे माध्यम आहे. चित्रपट हे एक असं माध्यम आहे जिथे लोकांना जागरूक केलं जाते. यासाठी जनतेला चांगला संदेश देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे.
रील आणि रिअल लाइफबद्दल सोनू सूद म्हणाला, रिअल लाईफपेक्षा मोठं काहीही नाही. सिनेमा काही तासांसाठीच बनतो आणि मग तो निघून जातो. अनेक चित्रपट येतात आणि जातात, पण जेव्हा तुम्ही सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेले असता, कोणासाठी तरी प्रेरणा बनता, कोणासाठी प्रयत्न करता, तेव्हा ती जीवनातील मोठी गोष्ट असते.