सोनू सूदला फॅन म्हणाला; मालदीव्सला पाठवा सर, अभिनेत्याचं उत्तर वाचून हसून व्हाल लोटपोट

By अमित इंगोले | Published: October 31, 2020 12:29 PM2020-10-31T12:29:26+5:302020-10-31T12:29:53+5:30

सोशल मीडियावर एका फॅनने सोनूकडे अशी मागणी केली की, सगळ्यांना हसू आवरणं कठिण झालंय. फॅनने सोनूकडे मागणी केली की, त्याला मालदीवला पाठवून द्यावं.

Sonu Sood viral tweet fan ask to send Maldives actor funny reply | सोनू सूदला फॅन म्हणाला; मालदीव्सला पाठवा सर, अभिनेत्याचं उत्तर वाचून हसून व्हाल लोटपोट

सोनू सूदला फॅन म्हणाला; मालदीव्सला पाठवा सर, अभिनेत्याचं उत्तर वाचून हसून व्हाल लोटपोट

googlenewsNext

अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात लोकांची भरभरून मदत केली. अजूनही तो जमेल कशी लोकांची मदत करत करतो. अशात काही लोकांना असं वाटतं की समस्या कोणतीही असो त्याचं समाधान करण्यााठी सोनू सूद आहेच. काही प्रमाणात हे खरंही आहे कारण त्याने समजातील वेगवेगळ्या वर्गापर्यंत मदत पोहोचवली. त्याच्यामुळे अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुललं.

अशात सोशल मीडियावर एका फॅनने सोनूकडे अशी मागणी केली की, सगळ्यांना हसू आवरणं कठिण झालंय. फॅनने सोनूकडे मागणी केली की, त्याला मालदीवला पाठवून द्यावं. ट्विटमध्ये लिहिलं की, सर मला मालदीवला जायचं आहे. पाठवून द्या. सोनूने यावर फारच मजेदार उत्तर दिलं.

सोनूने उत्तर दिलं की, सायकलने जाशील की रिक्षाने भाऊ? सोनूच्या या ट्विटवर लोक हसून हसून लोटपोट होत आहेत. याआधीही सोनूकडे अनेकांनी विचित्र किंवा गमतीदार मागण्या केल्या आहेत. त्यावर सोनू सूदने फनी उत्तरेही दिली आहेत. 

सोनूच्या एका ट्विटनंतर आणखीही काही यूजर्सने फॅनची खिल्ली उडवणं सुरू केलं आहे. कुणी या फॅनला मुंबईतील ऑटो करण्याचा सल्ला दिला आहे तर कुणी त्याच्याकडे अलादीनची चटई असल्याचं सांगितलं आहे. काही वेळातच सोशल मीडियावर हा फॅन ट्रेन्ड झाला आणि सोनूने त्याला दिलेलं उत्तरही सर्वांना लक्षात राहिलं.  

दरम्यान, सोनू सूदने बऱ्याच महिन्यांनंतर सिनेमाच्या शूटींगला सुरूवात केली आहे. याबाबत त्याने सांगितले की, कोरोना काळात त्याने लोकांची मदत केली याचा प्रभाव सेटवर बघायला मिळतो. लोक आदराने विचारपूस करतात, स्वागत करतात. अनेकजण सेटवर भेटायलाही येत असल्याचे तो बोलला.

Web Title: Sonu Sood viral tweet fan ask to send Maldives actor funny reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.