'फतेह'मध्ये दमदार अॅक्शन करताना दिसणार सोनू सूद, जाणून घ्यायाविषयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 13:49 IST2023-05-11T13:41:12+5:302023-05-11T13:49:36+5:30
सामान्य जनतेला भावणारा अभिनेता आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून सोनू सूद (Sonu Sood) प्रसिद्ध आहे.

'फतेह'मध्ये दमदार अॅक्शन करताना दिसणार सोनू सूद, जाणून घ्यायाविषयी
सामान्य जनतेला भावणारा अभिनेता आणि सगळ्यांचा लाडका अभिनेता म्हणून सोनू सूद (Sonu Sood) प्रसिद्ध आहे. सोनू सूद त्याच्या आगामी अॅक्शन-पॅक्ड चित्रपट फतेहसाठी सज्ज आहे, ज्यामध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेले अॅक्शन सीन प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. जगभरातील बेस्ट काम करण्याचा अनुभव असलेल्या ली व्हिटेकर यांना या अॅक्शन सीक्वेन्सवर काम करण्यासाठी एका विशेष टीमचे नेतृत्व करण्यासाठी लॉस अँजेलिसमधून आणण्यात आले आहे.
सोनू सूदने एलएच्या विशेष टीमच्या मदतीने प्रेक्षकांपर्यंत कधीही न पाहिलेले काहीतरी बेस्ट काम पोहचणार आहे असं सांगतो आणि स्वतःला आव्हान देण्याबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. सोनू म्हणाला "मला विश्वास आहे की अॅक्शन थ्रिलर्स लोकांच्या पसंतीस नक्कीच पडतील. फतेहसह, मी एक कलाकार म्हणून स्वतःला आव्हान देण्याचा आणि प्रेक्षकांनी यापूर्वी कधीही न पाहिलेले काहीतरी काम देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. ली व्हिटेकर आणि उर्वरित टीमने त्यांचा कामात कोणतीही कसर सोडली नाही. काही अविश्वसनीय अॅक्शन सीक्वेन्स तयार करताना जे आम्ही पडद्यावर दाखवण्यासाठी उत्सुक आहोत.", सोनू सूद म्हणतो.
फतेहमध्ये सोनू सूद आणि जॅकलीन फर्नांडिस मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिवज्योती राजपूत आणि विजय राज सुद्धा वेगळ्या भूमिकेत आहेत. वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट येणार आहे.