‘सोनू के टीटू की स्वीटी’ने दिला अनेकांना ‘धक्का’! बडे बडे ट्रेड पंडितही कमाई पाहून झालेत हैरान!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 07:05 AM2018-03-08T07:05:09+5:302018-03-08T12:35:09+5:30
बॉलिवूडसाठी फेबु्रवारी महिना लाभी ठरला. संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ गत २५ जानेवारीला रिलीज झाला. पण फेबु्रवारीत या चित्रपटाने जोरदार ...
ब लिवूडसाठी फेबु्रवारी महिना लाभी ठरला. संजय लीला भन्साळींचा ‘पद्मावत’ गत २५ जानेवारीला रिलीज झाला. पण फेबु्रवारीत या चित्रपटाने जोरदार कमाई करत हिंदी, तामिळ आणि तेलगू बॉक्सआॅफिसवर २८६.२४ कोटी रूपयांचा गल्ला जमवला. याअर्थाने २०० कोटींचा बेंच मार्क क्रॉस करणारा ‘पद्मावत’ हा या वर्षाचा पहिला चित्रपट ठरला. यानंतर ‘पॅडमॅन’,‘अय्यारी’,‘परी’ हे काही बिग स्टारर सिनेमे अलीकडच्या काळात रिलीज झालेत. यापैकी ‘पॅडमॅन’ वगळता अन्य कुठल्याही चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर फार चमक दाखवता आली नाही. अनुष्का शर्माचा ‘परी’ या चित्रपटाकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवली. पण या बिग स्टारर सिनेमांच्या गर्दीत एका सिनेमाने मात्र सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. होय, बडे बडे ट्रेड पंडितही या सिनेमाची घोडदौड पाहून आश्चर्यचकित झालेत. हा चित्रपट म्हणजे, ‘सोनू के टीटू की स्वीटी’. होय, कुणालाही अपेक्षित नसताना या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर अशी काही कमाई केली की, सर्वच चकित झालेत. भारतीय बॉक्सआॅफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत ७० कोटींची कमाई केली आहे. वर्ल्ड वाईड बॉक्सआॅफिसचे म्हणाल तर या चित्रपटाचे कलेक्शन १०० कोटींवर पोहोचले आहे.
ALSO READ : सोनू के टिटू की स्विटी मधील अभिनेता सनी सिंगचे अजय देवगणशी आहे खास नातं
ना मोठे स्टार, ना मोठा गाजावाजा, ना मोठे प्रमोशन...पण याऊपरही या चित्रपटाने बड्या बड्यांना घाम फोडला. कार्तिक आर्यन, नुसरत भरूचा आणि सिनी सिंह स्टारर या चित्रपटाने केवळ एंटरटेनिंग कंटेन्टच्या जोरावर प्रेक्षकांना आकर्षित केले. त्याचाच परिणाम म्हणजे, २४ कोटी रूपये खर्चून बनवलेला हा चित्रपट आता ७५ कोटींच्या बेंचमार्ककडे वाटचाल करतो आहे.
मार्चच्या पहिल्या आठवड्यात होली वीकेंडला अनुष्काचा ‘परी’ रिलीज झाला. या चित्रपटाने पाच दिवसांत आपली लागत वसूल केली. पण ‘सोनू के टीटू की स्वीटी’ने ‘परी’ला चांगलीच मात दिली.