Rakhi Sawant : “सूरज पांचोली माझा भाऊ,” राखी सावंतनं जिया खान केसमध्ये म्हटलं, “मुली असं का करतात?”
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 20:25 IST2023-04-30T20:25:03+5:302023-04-30T20:25:43+5:30
जिया खान प्रकरणी न्यायालयानं निकाल देत सूरज पांचोलीनं निर्दोष मुक्तता केली.

Rakhi Sawant : “सूरज पांचोली माझा भाऊ,” राखी सावंतनं जिया खान केसमध्ये म्हटलं, “मुली असं का करतात?”
Jiah Khan Suicide Case: बॉलिवूड अभिनेत्री जिया खान ३ जून २०१३ रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयानं तब्बल १० वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. यावर निकाल देताना न्यायालयानं सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली. यावर आता अभिनेत्री राखी सावंतनंही प्रतिक्रिया दिली आहे. तिनं पापाराजी समोर आपलं मत व्यक्त केलं आहे.
“मुली प्रेमात असं पडून सुसाईड का करतात? एक गेला तर दोन-चार मिळतील हो की नाही? स्टेशन जर सुरक्षित असेल तर १०० ट्रेन येतील. पाहा मी किती चांगलं स्टेशन आहे,” असं राखी सावंत म्हणाली. यानंतर तिला सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता केली यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली.
“सूरज पांचोली माझा भाऊ आहे. हे कोर्टाचं प्रकरण आहे. परंतु जिया खान विषयी माझ्या मनात संवेदना आहेत. देशातील प्रत्येक मुलीला प्रेम होतं. मलाही झालं. माझ्यासोबतही ट्रॅजिडी झाली. परंतु सर्वकाही विसरून आम्ही हसून जगतोय. हे आयुष्य एकदाच मिळतं. त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी प्रेमासाठी त्यांनी ते संपवू नये,” असं ती म्हणाली.
पुन्हा शोधतेय मुलगा
राखी सावंत नुकतीच इंडियन आयडॉलचा स्पर्धक मोहम्मद दानिशच्या लग्नात पोहोचली होती. दुसऱ्यांच्या लग्नात आपण नवरीसारख्या वेशात जातो. यामुळे कोणी मुलगा मिळेल अशी अपेक्षा आहे, असं तिनं म्हटलं. तसंच आदिल खान दुर्रानीबाबातही तिनं वक्तव्य केलं. त्यानंही अशाप्रकारे मोठ्या लग्नाचं आश्वासन दिलं होतं. परंतु सगळं खोटं निघालं, असंही राखी म्हणाली.