सुरज पांचोली पहिल्यांदाच बोलला आदित्य आणि कंगना रणौतच्या अफेअरवर, केले हे खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 18:40 IST2019-11-07T18:35:58+5:302019-11-07T18:40:19+5:30
आदित्य आणि कंगना यांच्या अफेअरबाबत सुरजने आजवर न बोलणेच पसंत केले होते. पण सुरजने नुकतेच पहिल्यांदाच या अफेअरबाबत भाष्य केले आहे.

सुरज पांचोली पहिल्यांदाच बोलला आदित्य आणि कंगना रणौतच्या अफेअरवर, केले हे खुलासे
आदित्य पांचोली आणि कंगना रणौत यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांनाच माहीत आहे. आदित्यच्या आयुष्यात कंगना आली, त्यावेळी त्याचे लग्न झाले होते आणि त्याला मुलं देखील होती. कंगना आणि आदित्य यांच्या अफेअरच्यावेळी सुरज लहान होता. या अफेअरबाबत सुरजने आजवर न बोलणेच पसंत केले होते. पण सुरजने नुकतेच पहिल्यांदाच या अफेअरबाबत भाष्य केले आहे.
आदित्य आणि कंगना यांच्यात जवळजवळ २० वर्षांचे अंतर होते. आदित्य तिच्यामागे पूर्णपणे वेडा झाला होता. त्याने तिच्यासाठी घर देखील घेतले होते असे म्हटले जाते. कंगना आणि आदित्यच्या या अफेअरमुळे सुरजच्या घरात कसे वातावरण असायचे याविषयी त्याने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्याने या मुलाखतीत म्हटले आहे की, माझ्या आई वडिलांमधील तो इश्शू होता. त्यामुळे मी त्यात कधीच पडलो नाही. मी माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या आजी-आजोबांसोबत घालवला. हे माझ्या आईवडिलांमधले खाजगी प्रकरण होते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी अतिशय वाईट होत्या.
आदित्य आणि कंगना हे प्रकरण आज नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. आदित्यने कंगनावर हात उचचला असल्याची तक्रारदेखील तिने पोलिसांकडे दाखल केली होती. त्याच दरम्यान २००८ ला आदित्यने मुंबई मिरर या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत कंगणा आणि मी अनेक वर्षं पती-पत्नीसारखेच राहात असल्याचे म्हटले होते. त्याने मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघे हे एखाद्या पती-पत्नीसारखेच होतो. आम्ही तीन वर्षं एक मित्राच्या घरात एकत्र राहात होतो. मी तिला भेटलो तेव्हा तिच्याकडे एक रुपयादेखील नव्हता. २७ जून २००४ला मी तिला सगळ्या पहिल्यांदा भेटलो.
मला पाहाताच ती आली आणि तिने मला हाय म्हटले आणि माझे नाव कंगना असे तिने मला सांगितले. ती मुंबईत आल्यावर आमच्या एका कॉमन मित्राने मला तिला मदत करायला सांगितले होते. त्यामुळे तिच्याशी मी एकदम व्यवस्थित बोललो. त्यानंतर तिने मला सतत फोन करायला सुरुवात केली. सुरुवातीला ती एका छोट्याशा गावातील अतिशय साधी मुलगी होती. मी हळूहळू करून तिच्या प्रेमात पडलो. आम्ही दोघे एकत्र राहायला लागलो.