सूरज पंचोली 'केसरी वीर'च्या सेटवर झाला गंभीर जखमी, अ‍ॅक्शन सीनदरम्यान झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 18:37 IST2025-02-04T18:37:05+5:302025-02-04T18:37:42+5:30

Sooraj Pancholi : अभिनेता सूरज पंचोलीला त्याच्या आगामी 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली.

Sooraj Pancholi seriously injured on the sets of 'Kesari Veer', injured during an action scene | सूरज पंचोली 'केसरी वीर'च्या सेटवर झाला गंभीर जखमी, अ‍ॅक्शन सीनदरम्यान झाली दुखापत

सूरज पंचोली 'केसरी वीर'च्या सेटवर झाला गंभीर जखमी, अ‍ॅक्शन सीनदरम्यान झाली दुखापत

अभिनेता सूरज पंचोली(Sooraj Pancholi)ला त्याच्या आगामी 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दुखापत झाली. सूरज पंचोली एक ॲक्शन सीन करत होता आणि त्याचवेळी तो भाजला. त्याच्या मांडीला दुखापत झाली आहे. असे सांगितले जात आहे की सूरज एक अतिशय तीव्र ॲक्शन सीनचे शूटिंग करत होते आणि त्याच क्षणी हा अपघात झाला.

'न्यूज १८'च्या रिपोर्टनुसार, सूरज पंचोली मुंबईतील फिल्मसिटीमध्ये शूटिंग करत होता. ॲक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शकाने सूरज पंचोलीला पायरोटेक्निक स्फोटावर उडी मारण्यास सांगितले. पण हा स्फोट ठरल्याप्रमाणे झाला नाही आणि शूटिंगच्या वेळेपूर्वीच झाला त्यामुळे सूरज भाजला गेला. स्फोटात गनपावडरचा अतिरेकी वापर केल्यामुळे सूरज पंचोलीच्या मांड्या आणि मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू भाजले. सूरजला खूप वेदना होत होत्या. सेटवर एक वैद्यकीय पथक देखील होते जेणेकरुन ते अभिनेत्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवू शकतील आणि शूटिंग चालू ठेवता येईल. या अपघातानंतर सूरजने शूटमधून ब्रेक घेण्यास नकार दिला आणि संपूर्ण शेड्यूलमध्ये शूटिंग सुरू ठेवले.

'केसरी वीर'मध्ये दिसणार हे कलाकार
'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ'चे दिग्दर्शन प्रिन्स धीमान यांनी केले आहे. हा चित्रपट एक बायोपिक असून गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिरात झालेल्या युद्धाभोवती फिरतो. या चित्रपटात सूरज पंचोलीचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. त्यांच्याशिवाय सुनील शेट्टी, विवेक ओबेरॉय आणि आकांक्षा शर्मा हे देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Sooraj Pancholi seriously injured on the sets of 'Kesari Veer', injured during an action scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.