जिया खान केसवरील डॉक्युमेंट्रीमध्ये सूरज पंचोलीला करायचंय काम, म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 02:25 PM2023-07-10T14:25:44+5:302023-07-10T14:27:56+5:30

अभिनेता सूरज पांचोलीची जिया खान आत्महत्या प्रकरणातून कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती.

Sooraj pancholi wants to feature in documentary showing jiah khan case after being acquitted by the court | जिया खान केसवरील डॉक्युमेंट्रीमध्ये सूरज पंचोलीला करायचंय काम, म्हणाला..

जिया खान केसवरील डॉक्युमेंट्रीमध्ये सूरज पंचोलीला करायचंय काम, म्हणाला..

googlenewsNext

या वर्षी एप्रिलमध्ये कोर्टाने बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीची जिया खान आत्महत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर सूरज पांचोली आता त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. 2015 मध्ये सलमान खानने सूरज पांचोलीला 'हीरो' या चित्रपटातून लॉन्च केले होते. सूरज पांचोली बिग बॉस ओटीटी 2 मध्ये दिसणार असल्याची बातमीही यापूर्वी आली होती. मात्र, सूरजच्या मनात काही वेगळेच आहे. त्याने मीडियाशी संवाद साधला आहे, ज्यामध्ये सूरजने बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं आहे.

बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोलीने एका मुलाखतीत सांगितले आहे की, मी कोणत्याही रिअ‍ॅलिटी शोचा भाग बनणार नाही. अभिनेता म्हणाला, मी कोणताही रिअ‍ॅलिटी शो करणार नाही. त्यांनी माझ्याशी याबाबत संपर्कही केला नाही. मी रिअ‍ॅलिटी शो करणार नाही. पुढे तो म्हणाला  की, त्याला चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करायचे आहे. तसेच, जिया खान प्रकरणावर कधी डॉक्युमेंट्री बनली तर त्याला नक्कीच त्याचा भाग व्हायला आवडेल. त्यामुळे आपली बाजू मांडण्याची संधी मिळेल, असेही तो म्हणाले.

बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली सलमान खानच्या खूप जवळ आहे. सलमान खाननेच सूरजला बॉलिवूडचा रस्ता दाखवला. मात्र, त्यानंतरही सूरज काही विशेष करू शकला नाही. जिया खानच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सूरज पांचोलीला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले होते, अशी माहिती आहे. 2013 मध्ये जिया खानने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर जियाच्या कुटुंबीयांनी सूरजवर अनेक आरोप केले. मात्र, आता न्यायालयाने सूरज पांचोलीला क्लीन चिट दिली आहे.

Web Title: Sooraj pancholi wants to feature in documentary showing jiah khan case after being acquitted by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.