Sooraj Barjatya : ‘हम आपके है कौन’च्या प्रीमिअरचा ‘तो’ किस्सा; त्याक्षणी सूरज बडजात्यांचंही टेन्शन वाढलं होतं..!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 01:45 PM2022-11-18T13:45:02+5:302022-11-18T13:48:10+5:30
Hum Aapke Hain Koun, Sooraj Barjatya : ‘हम आपके है कौन’ या सिनेमाने त्याकाळात सर्वांनाच वेड लावलं होतं. पण या चित्रपटाच्या प्रीमिअरचा किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसेल.
सूरज बडजात्या (Sooraj R. Barjatya) यांनी हिंदी सिनेसृष्टीला तीन ब्लॉकबस्टर सिनेमे दिलेत. मैंने प्यार किया, हम आपके है कौन आणि हम साथ साथ है. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. पण ‘हम आपके है कौन’ (Hum Aapke Hain Koun) या सिनेमाने त्याकाळात सर्वांनाच वेड लावलं होतं. पण या चित्रपटाच्या प्रीमिअरचा किस्सा वाचून तुम्हालाही धक्का बसेल. होय, प्रीमिअरच्या दिवशी चित्रपटगृहांतली स्थिती बघून स्वत: सूरज बडजात्या हे देखील टेन्शनमध्ये आले होते.
‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत सूरज बडजात्या यांनी हा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने मला खूप गोष्टी शिकवल्या. मला आठवतं, प्रीमिअर शो सुरू होता आणि गाणं सुरू झालं की, लोक उठून बाहेर चालायला लागायचे. प्रत्येक गाण्यासोबत हा ‘सिलसिला’ सुरू होता. गाणं सुरू झालं रे झालं की, कुणीतरी प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडत होता. मी हे पाहून घाबरलो होतो. लोकांना हा सिनेमा का आवडला नाहीये? असा प्रश्न मला पडला होता. कारण तोपर्यंत मी खूप उत्कृष्ट सिनेमा बनवलायं, असं मला वाटतं होतं. पण प्रीमिअरच्या दिवशी वेगळंच चित्र होता. त्याक्षणी एक तरूण मुलगा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, हे सगळ्यांसोबतच घडतं. राज कपूर यांच्यासोबतही असंच घडलं होतं. त्यामुळे तुम्ही आता तुमच्या नव्या सिनेमावर काम सुरू करायला हवं. ‘मेरा नाम जोकर’ राज कपूरचा पॅशन प्रोजेक्ट होता. पण हा सिनेमा गर्दी खेचू शकला नाही. आज लोक त्याच सिनेमाला क्लासिक म्हणतात. अर्थात ‘हम आपके है कौन’ची अवस्था ‘मेरा नाम जोकर’सारखी झाली नाही. चार दिवसानंतर हा सिनेमा गर्दी खेचू लागला. अशी काही हवा झाली की माझा हा सिनेमा सरप्राइज हिट ठरला. या चित्रपटाने मला एकच गोष्ट शिकवली त म्हणजे, तुम्हाला फक्त सिनेमा बनवायचा आहे आणि तो लोकांसमोर ठेवायचा आहे. लोकांना सिनेमाची समज नाही,असं तुम्ही म्हणू शकत नाही. कारण पब्लिक सब जानती है...
‘हम आपके है कौन’ या सिनेमाने भारतात 72.47 कोटींचा बिझनेस केला होता. जगभर या चित्रपटाने 250 कोटी कमावले होते. कोणत्याही नव्या सिनेमाला 15 वर्षे सलमान व माधुरी दीक्षितच्या या सिनेमाचा कमाईचा रेकॉर्ड मोडता आला नव्हता.